कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना जिल्हा परिषदेसाठी एकत्र 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मार्च 2017

सांगली - सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठीची निवड 21 फेब्रुवारीला होणार आहे. कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्यामुळे सत्ता स्थापनेचा पेच कायम आहे. राज्यभर भाजपला रोखण्यासाठी जिल्हा परिषद सत्ता स्थापनेत शिवसेनेने कॉंग्रेस व राष्ट्रवादीला पाठिंबा दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यात सोनहिरा साखर कारखान्यावर आज चर्चा झाली. दरम्यान, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनी सांगली जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र येत असल्याचे सांगितले. 

भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीसाठी शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी एकत्र येणार आहे. भाजप वगळता हालचालींना वेग आला आहे. त्याचीच पुनरावृत्ती सांगलीत होवू शकते. सांगली जिल्हा परिषदेत 60 सदस्य आहेत. त्यामध्ये भाजप 25 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. रयत विकास आघाडीचे 4, शिवसेनेचे 3, राष्ट्रवादीसह व सहयोगी 16, कॉंग्रेस-10, स्वाभिमानी शेतकरी संघटना व अपक्ष 1 अशी सदस्य संख्या आहे. भाजपने 31 सदस्यांची मॅजिक फिगर गाठण्यासाठी निवडणूक निकालापासून तयारी केली आहे. भाजपला सत्तेसाठी रयत विकासच्या चार आणि शिवसेनेच्या तीन सदस्यांची गरज आहे. 

कॉंग्रेस व राष्ट्रवादीची सदस्यसंख्या 26 होते. एक बंडखोर आणि शिवसेनेच्या 3 सदस्य मिळून 30 वर संख्या पोचते. जिल्हा परिषदेसाठी मिरज तालुक्‍यात कॉंग्रेस-स्वाभिमानी शेतकरी संघटनेची युती होती. त्यांचा एक सदस्य आहे. हे सर्व एकत्र आले तर आघाडीची सत्ता येणे शक्‍य आहे. 

सत्तेसाठी "सोनहिरा'वर खलबते 
कडेगाव - जिल्हा परिषदेत भाजपला रोखण्यासाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादीची गुप्त खलबते सुरू झाली आहेत. विवाह समारंभानिमित्त कडेपूर येथे व त्यानंतर सोनहिरा कारखाना कार्यस्थळावर राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील व कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम यांच्यात आज "चाय पे' चर्चा झाली. नेमकी काय चर्चा झाली हे पडद्याआड असले तरी जिल्हा परिषदेत भाजपला वगळून सत्ता स्थापनेच्या गणितावर चर्चा झाल्याचे समजते. 

निवडणूक निकालानंतर जिल्हा परिषदेत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली. भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र येण्याबाबत वरीष्ठ पातळीवरून हालचाली सुरू झाल्या. तोपर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्याने जिल्ह्यातील कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. निवडणुकीपुर्वी एकमेकांवर तोफा डागणारे नेते आता भाजपचा वारू रोखण्यासाठी एकत्र आले आहेत. कडेपूर येथे आज एका लग्न समारंभात जयंत पाटील व मोहनराव कदम हे एकत्र आले. तेथे उभय नेत्यांमध्ये हास्यविनोद व चर्चा रंगली होती. लग्नसमारंभ आटोपल्यानंतर मोहनराव कदम यांच्या गाडीत जयंत पाटील बसले. यावेळी त्यांच्यात सोनहिरा कारखाना कार्यस्थळावर येईपर्यंत जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसंदर्भात चर्चा झाल्याचे वृत्त आहे. यावेळी राज्य बॅंकेचे माजी अध्यक्ष माणिकराव पाटील, सोनहिराचे उपाध्यक्ष पी. सी. जाधव उपस्थित होते. 

Web Title: Congress, NCP, Shiv Sena District Council together