खोरोचीमध्ये कॉग्रेसपुरस्कृत पॅनेलचा विजय

खोरोचीमध्ये कॉग्रेसपुरस्कृत पॅनेलचा विजय

वालचंदनगर खोरोची (ता.इंदापूर)- येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीमध्ये काँग्रेस पुरस्कृत पॅनेलला सरपंचपदाची जागा खेचून आण्यामध्ये यश मिळाले. ११ पैकी ६ जागांवरती राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनेलचे उमेदवार विजयी झाले अाहेत.

खोरोची गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत जय भवानी ग्रामविकास पॅनेल व कॉग्रेस पुरस्कृत जय भवानी ग्रामविकास परिवर्तन पॅनेल यांच्यामध्ये चुरशीची निवडणूक झाली.यामध्ये सरपंचपदाच्या निवडणूकीमध्ये काँग्रेस पुरस्कृत पॅनेलच्या माया अरुण कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनेलच्या अरुणा गुणवंत साठे यांचा 223 मतांनी पराभव करुन विजय मिळविला. राष्ट्रवादी कॉग्रेस पुरस्कृत पॅनेलचे 11 पैकी 6 उमेदवार विजयी झाले. तर कॉग्रेस पुरस्कृत पॅनेलचे 5 उमेदवार विजयी झाले असुन रुपाली संपत सरक या प्रभाग दोन व तीन मधून विजयी झाल्या आहेत.

संपत सरक हे राष्ट्रवादी काॅग्रेसचे कट्टर कार्यकर्ते होते. मात्र त्यांच्या पत्नीने रुपाली यांनी ग्रामपंचायत निवडणूक त्यांनी कॉग्रेस पुरस्कृत पॅनेलच्या माध्यमातुन लढवली आहे. राष्ट्रवादी कॉग्रेस पुरस्कृत जय भवानी  ग्रामविकास पॅनेलचे विजयी उमेदवार व मिळालेली मते...
 प्रभाग - 2 शैलेंद्र अशोक भोसले (322), सुरेखा रमेश नगरे  (299)
प्रभाग - 3 सागर लक्ष्मण सलगर (284)
प्रभाग - 4 दिनेश अनंता हेगडकर (374), वर्षा गणेश भाळे (324), फडतरे सुजाता दत्तात्रेय (316)

काॅग्रेस पुरस्कृत जय भवानी ग्रामविकास परिवर्तन पॅनेलचे विजयी उमेदवार व मिळालेली मते.
प्रभाग - 1 सदाशिव नामदेव किसवे (330), कोमल विनोद सावंत (272)
प्रभाग - 2 रुपाली संपत सरक (296)
प्रभाग - 3 संजय महादेव साखरे (329) , रुपाली संपत सरक (426)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com