'परिवर्तन लाटेत कॉंग्रेस हद्दपार होईल'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

जत - केंद्र, राज्यातील सरकारने अडीच वर्षात उल्लेखनीय काम केले. त्या जोरावर व सध्या ग्रामीण भागात उसळलेल्या परिवर्तन लाटेत येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीतून कॉंग्रेस हद्दपार होईल, असा विश्‍वास भाजपाच्या प्रदेश महिला अध्यक्षा नीताताई केळकर यांनी व्यक्‍त केला. उमदी पंचायत समिती गटातील उमेदवार संजय तेली व गणातील सौ. उज्ज्वला सावंत यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहीर सभेत त्या बोलत होत्या. 

सौ. केळकर म्हणाल्या, ""दुष्काळी भागाला न्याय देण्याची भूमिका प्रथम भाजपाने घेतली. म्हैसाळच्या सहाव्या टप्प्याचे काम सुरू करण्यात भाजपाचा वाटा आहे. त्यानंतर आघाडीने 10 वर्षे सत्ता भोगली. पण एकही काम केले नाही. "म्हैसाळ' योजना पंतप्रधान सिंचन योजनेत घेतल्याने आता निधी कमी पडणार नाही. जतच्या मध्यावर आलेले पाणी दोन वर्षात पूर्व भागात येईल.'' 

डॉ. रवींद्र आरळी म्हणाले, ""रोहयो या सामान्यांसाठी असलेल्या योजनेचा फायदा अनेक गावांनी घेतला. कांही गावांतील कॉंग्रेसच्या मंडळींनी भ्रष्टाचार केला. ते उघडकीस आणण्याचे काम आमदारांनी केले. त्याची चौकशी करून पुन्हा भ्रष्टाचार होऊ नये म्हणून आमदारांनी कारवाई करावी, अशी मागणीही केली आहे. पंतप्रधानांच्या अनेक निर्णयामुळे विरोधकांची पायाखालची वाळू सरकली आहे. देश, राज्यात भाजपाची सत्ता आहे. तेच वारे ग्रामीण भागात वाहू लागलेय. मिनी मंत्रालयावर भाजपाचा झेंडा फडकवण्यासाठी लोकच उत्सुक आहेत.'' 

शिवाजीराव ताड म्हणाले, ""कॉंग्रेस भूलथापा पक्ष आहे. तालुका ओट्यात घेणाऱ्या कदमांनी तालुक्‍याचा तीळ मात्र विकास केला नाही. नुसत्या गप्पा मारायच्या अन्‌ लोकांना फसवत राहायचं, असा उद्योग झाला.'' 

संजय तेली, उमेश सावंत, स्वरदा केळकर यांनी मनोगत व्यक्‍त केले. यावेळी चंद्रकांत गडडोडगी, जयसिंगराव सावंत, कल्लाप्पा हलकुडे, सौ. उज्ज्वलाकाकी सावंत, सौ. दीप्ती सावंत आदी उपस्थित होते.

Web Title: Congress passed the border in parivartan