सांगली : सलोखा संपवण्याच्या षंडयंत्राचा उद्या काँग्रेसतर्फे निषेध 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 एप्रिल 2018

सांगली : भारतीय जनता पक्षाने देशात राजकीय हेतूने सामाजिक सलोखा संपवण्याचे षडयंत्र सुरु ठेवले आहे. त्याच्या निषेधार्थ उद्या ( ता. 9) काँग्रेसतर्फे सांगली शहरातील स्टेशन चौकात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिली.  

ते म्हणाले,"विकास कामांचे ढोंग करुन केंद्र व राज्यात सत्तेवर आलेल्या भाजपने खरे स्वरुप दाखवायला सुरुवात केली आहे. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर अपयशावर पांघरुण घालण्यासाठी जातीय तेढ निर्माण करण्यास सुरुवात केली आहे, काँग्रेसने 65 वर्षात देशात शांतता व सलोखा निर्माण केला. त्याला तिलांजली देण्याचा उद्योग भाजपकडून सुरु आहे. भाजपच्या या धोरणाला विरोध म्हणून धरणे आंदोलन केले जाणार आहे. पक्षाचे नेते, आजी-माजी पदाधिकारी आंदोलनात सहभागी होतील.''

Web Title: congress protest against bjp tomorrow