काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी खांदेपालट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

खटाव - काँग्रेसच्या खटाव व माण तालुक्‍यांच्या अध्यक्षपदांचा खांदेपालट करण्यात आला. खटाव तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी डॉ. विवेक देशमुख, तर माण तालुक्‍याच्या अध्यक्षपदी एम. के. भोसले यांची निवड झाली. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने संघटनात्मक बांधणी करण्यासाठी पदाधिकाऱ्यांची खांदेपालट केल्याची चर्चा आहे.

खटाव तालुका काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्याकडे होती. कुरोली गणाचे माजी पंचायत समिती सदस्य डॉ. विवेक देशमुख यांची नूतन तालुकाध्यक्षपदी निवड करताना काँग्रेसने संघटनात्मक बांधणीत तरुण नेतृत्वाला वाव देण्याचे धोरण अवलंबल्याचे दिसत आहे. 

माण तालुका काँग्रेसची धुरा माजी अध्यक्ष अर्जुन काळे यांच्याकडून माजी जिल्हा उपाध्यक्ष एम. के. भोसले यांच्याकडे सोपविण्यात आली. काँग्रेसचे दीर्घकाळ तालुकाध्यक्ष, सरचिटणीस, उपजिल्हाध्यक्ष तसेच ‘इंटक’चे १६ वर्षे जिल्हाध्यक्षपद भूषविणाऱ्या भोसलेंना संघटनात्मक बांधणीचा चांगला अनुभव आहे. माण, खटाव विधानसभा मतदारसंघावर आमदार जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे वर्चस्व आहे. आताही इतर पक्षांची स्थिती पाहता आमदारांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची संघटनात्मक बांधणी चांगली आहे.

संघटना बळकट करण्यावर भर देणार
तालुकाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना एम. के. भोसले व डॉ. विवेक देशमुख म्हणाले, ‘‘माण व खटाव तालुक्‍यांत आमदार गोरेंच्या कुशल नेतृत्वाखाली इतरांच्या तुलनेत काँग्रेस बऱ्यापैकी सक्षम आहे. पक्षातील आजी-माजी पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन पक्षाची विचारधारा आणखी तळागाळापर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करणार आहे. आमदार गोरेंच्या कार्यकाळात माण आणि खटाव तालुक्‍यांत खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकासाचे पर्व उभे राहिले. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणखी बळकट करण्यावर भर देणार आहे.’’

Web Title: congress tahsil chief selection politics