कॉंग्रेसचे आज नोटाबंदीविरोधात आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

कोल्हापूर - नोटाबंदीविरोधात उशिरा का होईना जाग आलेल्या कॉंग्रेसच्यावतीने उद्या (ता. 6) जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन जिल्हाधिकारी यांनाच घेराओ घालण्याचे आंदोलन करण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजता हे आंदोलन होईल. 

प्रदेश कॉंग्रेसने उद्या एकाच दिवशी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी 11 वाजता हे आंदोलन करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार कोल्हापुरात हे आंदोलन होत आहे. या आंदोलनाच्या नियोजनासाठी सोमवारी कॉंग्रेस कमिटीत बैठकही घेण्यात आली. या आंदोलनात प्रत्येक तालुक्‍यातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सहभागी करण्याचे आवाहन करण्यात आले. 

केंद्र सरकारने 8 नोव्हेंबर रोजी नोटबंदी जाहीर केली, त्यानंतर 30 डिसेंबरपर्यंत जुन्या नोटा स्वीकारण्याची मुदत होती. या 50 दिवसांच्या काळात सामान्य लोकांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला. ग्रामीण भागातील अर्थकारण तर ठप्पच होते. या काळात केवळ पत्रकार परिषदा व भाषणातच कॉंग्रेस नेत्यांनी याचा निषेध नोंदवला. बराच काळ सत्तेत राहिल्याने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची सवय नसलेल्या कॉंग्रेसला या नोटाबंदीविरोधात आंदोलन करण्यासाठी उशिरा का होईना जाग आली. 

उद्या (ता. 6) कॉंग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी यांना घेराओ आंदोलन केल्यानंतर 8 जानेवारी रोजी महिला कॉंग्रेस, युवक कॉंग्रेस व कॉंग्रेसच्या विविध सेलच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच 11 वाजता घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे.

Web Title: Congress today's movement against notabandi