Loksabha 2019 : अडथळा दूर झाल्याने जिल्ह्यात काँग्रेसची लाट - बाळासाहेब थोरात

nagar
nagar

नगर - "जिल्ह्यात काँग्रेसची लाट आली आहे. पक्षात अनेक तरुण प्रवेश करीत आहे. नवीन तरुणांना संधी प्राप्त होत आहे. पक्षाला ज्यांनी सोडले, ते फसले. सत्ता म्हणजे सर्व काही नसते. पक्षाची विचारधारा महत्त्वाची असते. पक्षात असलेला अडथळा दूर झाल्याने कार्यकर्त्यांना वाट मोकळी झाली आहे,''अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी विखे कुटुंबीयांचा नामोल्लेख टाळत केली. 

जिल्हा काँग्रेस समिती व संलग्नित सर्व आघाड्यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा शहरातील तुषार गार्डन येथे रविवारी झाला. आमदार भाऊसाहेब कांबळे व सुधीर तांबे, नूतन जिल्हाध्यक्ष करण ससाणे, जिल्ह्याचे निरीक्षक शरद रणपिसे, माजी खासदार दादा पाटील शेळके, तसेच विनायक देशमुख, राजेंद्र नागवडे, सबाजी गायकवाड, उबेद शेख, दीप चव्हाण, बाजीराव खेमनर, प्रताप शेळके, किरण पाटील, चंद्रकांत उजागरे, लता डांगे, डी. एम. कांबळे या वेळी उपस्थित होते. 

थोरात म्हणाले, "आमदार कांबळे नम्र व शांत व्यक्तिमत्त्व आहे. दुसऱ्यांसारखे ते चिमटे काढत नाहीत. काँग्रेसला चांगले दिवस येत आहेत. त्यामुळे पक्षात असल्याचा अभिमान बाळगा. नगर व शिर्डी मतदारसंघांतील दोन्ही उमेदवार निवडून आणायचे आहेत.'' 

प्रास्ताविकात आमदार तांबे म्हणाले, "देशात जे चांगले दिसत आहे, ते काँग्रेसने दिले आहे. वाईट दिसते ती भाजपची देण आहे.'' नागवडे, देशमुख, शहाजी भोसले, ससाणे, सत्यजित तांबे आदींनीही मनोगत व्यक्त केले. या वेळी राशीन, जामखेड, पाथर्डी आदी ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांनी आभार मानले. 

त्यांची जागा दाखवून दिली... 
"मी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष असलो, तरी भाजपचा प्रचार करीन, असे जिल्हाध्यक्ष म्हणाले. पक्षश्रेष्ठींनी नूतन जिल्हाध्यक्षांची निवड करून त्यांना त्यांची जागा दाखवून दिली,'' असे म्हणत थोरातांनी माजी जिल्हाध्यक्ष अण्णा शेलार यांचा नामोल्लेख टाळत त्यांच्यावर टीका केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com