सोलापूर महापालिका निवडणुकीत काँग्रेसने राखला गड 

विजयकुमार सोनवणे 
शनिवार, 7 एप्रिल 2018

कॉंग्रेसचे नगरसेवक रफीक हत्तुरे यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली. कॉंग्रेसने त्यांचे बंधू तौफीक यांनाच उमेदवारी दिली. दिवंगत हत्तुरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तौफीक यांना निवडून देणे आवश्‍यक आहे, असे भावनात्मक आव्हान करण्यात आले.

सोलापूर : महापालिका प्रभाग 14 क च्या पोटनिवडणुकीत परंपरागत प्रतिस्पर्धी एमआयएमचे पीर अहंमद शेख यांचा पराभव करीत कॉंग्रेसचे तौफीक हत्तुरे यांनी विजय मिळवत काँग्रेसचा गड राखला. हत्तुरे यांना ४३६१ मते मिळाली. तर पीर अहमद शेख ३३४० मते मिळाली. 

काँग्रेसचे नगरसेवक रफीक हत्तुरे यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली. कॉंग्रेसने त्यांचे बंधू तौफीक यांनाच उमेदवारी दिली. दिवंगत हत्तुरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तौफीक यांना निवडून देणे आवश्‍यक आहे, असे भावनात्मक आव्हान करण्यात आले. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे व आमदार प्रणिती शिंदे यांनी श्री हत्तुरे यांच्या प्रचारासाठी सभा घेतल्या होत्या. एकूणच एमआयआमचा बालेकिल्ला झालेल्या या प्रभागात आपला "गड' राखण्यात यश मिळवले. श्री. हत्तुरे यांच्या विजयामुळे कॉंग्रेसचे महापालिकेतील पक्षीय बळ 14 इतकेच राहिले आहे. 

उमेदवार व त्यांना मिळालेली मते 
भाजप ः रणजीतसिंह दवेवाले - 1921
शिवसेना ः बापू ढगे - 853
कॉंग्रेस ः तौफिक हत्तुरे - 4944
माकप ः नलिनी कलबुर्गी - 1169
एमआयएम ः पीरअहमद शेख - 3340
हिंदुस्थान जनता पार्टी ः गौस कुरेशी- 30
अपक्ष ः वसीम सालार - 499
राष्ट्रवादी ः सद्दाम शाब्दी -  900
अपक्ष ः कय्युम सिद्दीकी- 15
नोटा ः 51

Web Title: congress wins in Municipal corporation election bypoll