कॉंग्रेसचे नागवडे यांचा आज भाजपमध्ये प्रवेश

संजय आ. काटे
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

श्रीगोंदे(नगर) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंद्यातील राजकीय समीकरणांच्या कोलांट्याउड्या वाढतच असून राष्ट्रवादीकडून आता राहुल जगताप नव्हे, तर अण्णा शेलार किंवा घन:श्‍याम शेलार यांच्यापैकी एकास उमेदवारी मिळण्याची दाट शक्‍यता आहे. दरम्यान, कॉंग्रेस नेते राजेंद्र नागवडे व त्यांच्या पत्नी अनुराधा नागवडे मुंबईत पोचल्या असून, दुपारनंतर नागवडे दाम्पत्य भाजपात प्रवेश करण्याची शक्‍यता राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे.

भाजपने माजी मंत्री बबनराव पाचपुते यांची उमेदवारी निश्‍चित केल्यानंतर विरोधकांची हवा गुल झाली. भाजपा प्रवेशासाठी मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या अनुराधा नागवडे यांना उमेदवारी मिळाली नसली, तरी त्या आज भाजपात प्रवेश करण्याची शक्‍यता नागवडे कारखान्याच्या एका जबाबदार संचालकांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली. तसे झाल्यास पाचपुते व नागवडे एकाच व्यासपीठावर येतील. अर्थात हे कार्यकर्त्यांना रुचेल की नाही, हे निवडणुकीदरम्यान समजणार आहे. त्याबाबत राजेंद्र नागवडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही नवी खेळी खेळत असून, माळी समाजाचे तगडे नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णा शेलार यांच्या उमेदवारीसाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. त्यांच्यासोबतच अजित पवार यांच्या जवळचे घन:श्‍याम शेलार यांच्या उमेदवारीचीही चर्चा आहे. अण्णा शेलार हे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या अत्यंत जवळचे समजले जातात. पाचपुते व त्यांच्यात आलेला दुरावा आता निवडणुकीत समोरासमोर ठाकण्याची शक्‍यता आहे.

आमदार जगताप हे भाजपाच्या कायम संपर्कात राहिल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून उमेदवारीसाठी त्यांना अडचणी असल्याचे समजते.
---

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress's Nagvade joins BJP today