सामाजिक सलोखा राखण्यासाठी काँग्रेसचे एकदिवसीय उपोषण

हेमंत पवार 
सोमवार, 9 एप्रिल 2018

कऱ्हाडः सामाजिक सलोखा व शांतता कायम राखण्यासाठी काँग्रेसच्यावतीने आज सोमवारी कऱ्हाडच्या कोल्हापूर नाक्यावर महात्मा गांधी पुतळ्यासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण सुरु करण्यात आले. 

कऱ्हाडः सामाजिक सलोखा व शांतता कायम राखण्यासाठी काँग्रेसच्यावतीने आज सोमवारी कऱ्हाडच्या कोल्हापूर नाक्यावर महात्मा गांधी पुतळ्यासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण सुरु करण्यात आले. 

जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार आनंदराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपोषण सुरु आहे. उपोषणामध्ये काँग्रेसच्या जिल्हा महिला अध्यक्षा रजनी पवार, मलकापुरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, हिंदुराव पाटील, अजित पाटील, इंद्रजीत चव्हाण, सुनिल पाटील, जिल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात, मंगल गलांडे, शंकरराव खबाले, नगरसेवक आप्पा माने, पैलवान नाना पाटील, जयवंत जगताप, मलकापुरचे नगरसेवक राजेंद्र यादव, उदय थोरात, मानसिंग पाटील, नरेंद्र पाटील, श्रीकांत मुळे यांच्यासह पंचायत समिती सदस्य, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते त्यामध्ये सहभागी झाले.  

Web Title: Congress's one-day fasting to maintain social reconciliation