'गडबडी करणाऱ्यांचा सातबारा उघडू '

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

दुधोंडी - काही ठिकाणी गटातटाचे राजकारण चालते, ते ताबडतोब बंद करा, गडबडी करणाऱ्या कार्यकर्त्यांची माहिती घेऊन त्यांचा सातबारा उघडू. तसेच विरोधी पक्षांच्या भूलभापांना मतदार यंदा त्यांची जागा दाखवतील, असा विश्‍वास माजी मंत्री पतंगराव कदम यांनी व्यक्त केला. 

दुधोंडी येथे कॉंग्रेसची प्रचार सभा झाली, त्यावेळी ते बोलत होते. ग्रामदैवत शिवभवानी व गणेश मंदिरासह श्री हजरत पीर दर्ग्यांमध्ये श्रीफळ वाढवून प्रचारांचा प्रारंभ केला. मानसिंग बॅंकेचे संस्थापक जे. के. जाधव उपस्थिती होते. 

पतंगराव कदम म्हणाले, ""दुधोंडी झेडपी गटातील सर्वच गावात गेल्या दहा वर्षांत मोठ्या प्रमाणावर विकास केला आहे. त्यामुळे या विभागातील सर्वच उमेदवारांचा विजय निश्‍चितच आहे. कार्यकर्त्यांनी मात्र या विभागातील ज्येष्ठ नेते जे. के. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी काम करावे. इथे गटातटांत गडबडी फार वाढल्या आहेत. त्यांचा योग्यवेळी समाचार घेऊ. येथील मतदार विरोधी पक्षांच्या भूलथापांना बळी पडणार नाही.'' जे. के. जाधव म्हणाले, ""कॉंग्रेस पक्षाने दिलेली जबाबदारी गेली 10 वर्षे समर्थपणे पेलत आहे. याही वेळेला या विभागातील सर्वच उमेदवारांना मोठ्या मताधिक्‍क्‍याने निवडून आणणारच.'' 

यावेळी मानसिंग बॅंकेचे अध्यक्ष सुधीर जाधव, गणपतराव सावंत, प्रल्हाद जाधव, जयसिंग नावडकर, प्रवीण पाटील, प्रशांत नलवडे, अशोक जाधव, पै. उत्तमराव पाटील, संपत पाटील, जगन्नाथ मोटे, संजय पाटील, दीपक पाटील, डॉ. नागराज रानमाळे, सुभाष साळुंगे, अशोक भोसले, गिरीशकाका गोंदील, निर्मलाताई जाधव, सभापती सुनील नलवडे, भूपाल जाधव उपस्थित होते.

Web Title: Congress's rallies in dudhondi