सातत्यपूर्ण अभ्यासाने यश निश्चित : प्रियांका भोसले

श्रीकांत मेलगे
शनिवार, 7 जुलै 2018

मरवडे (सोलापूर) : भविष्यात आपल्याला नेमके काय बनायचे आहे हे निश्चित करून सातत्यपूर्ण अभ्यास केल्यास यश निश्चित मिळेल असे मत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या सेंट्रल आर्मड पोलीस फोर्स परीक्षेत देशात मुलीत प्रथम क्रमांक मिळविलेल्या प्रियांका पितांबर भोसले यांनी व्यक्त केले.

मरवडे (सोलापूर) : भविष्यात आपल्याला नेमके काय बनायचे आहे हे निश्चित करून सातत्यपूर्ण अभ्यास केल्यास यश निश्चित मिळेल असे मत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या सेंट्रल आर्मड पोलीस फोर्स परीक्षेत देशात मुलीत प्रथम क्रमांक मिळविलेल्या प्रियांका पितांबर भोसले यांनी व्यक्त केले.

मरवडे (ता. मंगळवेढा) येथील हनुमान विद्या मंदिर प्रशालेत आयोजित सत्कार समारंभात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मरवडे भूषण गोविंद चौधरी हे होते. यावेळी व्यासपीठावर माजी सभापती  अॅड.नंदकुमार पवार, जिल्हा युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष अविनाश शिंदे,मरवडे भूषण बाळासो भगरे,पितांबर भोसले,अॅड.पूनम भोसले, शहाजीराजे पवार,डॉ.माणिक पवार, सुभाष भुसे, प्राचार्य संभाजी रोंगे, माजी सरपंच शिवाजी पवार, दादासो पवार,अल्लाबक्ष इनामदार, विजय पवार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रियांका भोसले, मुंबई मंत्रालयात उपसचिव पदावर कार्यरत असणारे प्रियांकाचे वडील पितांबर भोसले, मुंबई उच्च न्यायालयात कायदेतज्ञ म्हणून काम करणाऱ्या प्रियांकाच्या आई अॅड.पूनम भोसले, आजी विजया पाटील यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.

शिक्षण घेत असताना काही अडचणी आल्यास गोर-गरीब विद्यार्थ्यांना मदत करण्यास आपण नेहमीच तयार आहोत असे नमूद करून प्रियांका भोसले पुढे म्हणाल्या की, सध्या शासकीय सेवेत काम करण्याची इच्छा प्रत्येकात दिसून येत आहे. कठोर परिश्रम करण्याची तयारी, जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास आपणास शासकीय सेवेत काम करण्याची संधी मिळतेच असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या सत्कार समारंभाचे सूत्रसंचालन प्रमोद कुलकर्णी यांनी तर आभार पर्यवेक्षक औदुंबर गायकवाड यांनी मानले.

Web Title: consistency in study results in success said priyanka bhosale