बांधकाम व्यावसायिक सुनील गेंजगेंची आत्महत्या

बांधकाम व्यावसायिक सुनील गेंजगेंची आत्महत्या

कोल्हापूर - मुक्त सैनिक वसाहतीमधील एका साईटवर नामवंत बांधकाम व्यावसायिक सुनील बाळकृष्ण गेंजगे (वय ५०, सम्राटनगर) यांनी विष पिऊन आत्महत्या केली. याबाबतची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत शाहूपुरी पोलिस ठाण्यात सुरू होते.

सम्राटनगर येथील सिव्हिल इंजिनिअर सुनील गेंजगे हे बांधकाम व्यावसायिक आहेत. २५ वर्षापासून ते या व्यवसायात आहेत. मुक्त सैनिक वसाहत येथील एका बांधकामाच्या साईटमधील बेसमेंटमध्ये त्यांचे कार्यालय आहे. सकाळी ते नेहमीप्रमाणे कार्यालयात गेले; मात्र त्यांचा सायंकाळपर्यंत फोन लागत नसल्याने नातेवाइकांना त्यांची काळजी वाटू लागली. ते सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांच्या कार्यालयात गेले; मात्र कार्यालयाचा दरवाजा बंद होता. त्यांनी गेंजगे यांना हाका मारल्या; मात्र आतून प्रतिसाद न मिळाल्याने अखेर त्यांनी दरवाजा तोडला. त्यावेळी त्यांना गेंजगे यांनी विषप्राशन केले असून, ते बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे निदर्शनास आले.  

त्यांना तातडीने  रुग्णवाहिकेतून  सीपीआरमध्ये दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. त्यानंतर नातेवाईक व मित्रपरिवाराने सीपीआरमध्ये मोठी गर्दी केली. नातेवाइकांनी आक्रोश केला. शवविच्छेदनानंतर पोलिसांनी मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. काही दिवसांपासून त्यांचा मोबाईल बंद होता. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही; पण खासगी सावकारीला कंटाळून त्यांनी हे कृत्य केले असावे, अशी चर्चा मात्र सीपीआर परिसरात सुरू होती. 

सुनील गेंजगे यांच्या आत्महत्येची नोंद पोलिस ठाण्यात करण्याचे काम सुरू आहे. याबाबत जाब-जबाबही नोंदवले जात असून, आत्महत्येच्या नेमक्‍या कारणाचा शोध घेतला जात आहे.
- संजय मोरे,
पोलिस निरीक्षक, शाहूपुरी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com