crime in junnar
crime in junnarsakal

वडगावात रिक्षा स्टॅंडजवळ गवंड्याची हत्या; आरोपी ताब्यात

दोन हजारासाठी गवंड्याचा खून; वडगाव रिक्षा स्टॅंड येथील घटना

बेळगाव : वडगाव, (Wadgaon) रिक्षा स्टॅंडजवळ गवंड्याचा केवळ २ हजार रुपयांसाठी खून झाल्याची घटना आज (ता.२) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. महादेव मारुती जाधव (वय ४८, मुळचे रा. आंबेवाडी, सध्या भारतनगर वडगाव, बेळगाव) असे मयताचे नाव आहे. तर सूरज पुंडलिक केदार (रा. नाझर कॅम्प, बेळगाव) संशयित आरोपीचे नाव आहे.

Summary

मयत जाधव आणि सूरज गवंडी काम करायचे. काही दिवसांपूर्वी सूरज याने २ हजार रुपये जाधवकडून घेतले होते.

याबाबत माहिती अशी की,

मयत जाधव आणि सूरज गवंडी काम करायचे. काही दिवसांपूर्वी सूरज याने २ हजार रुपये जाधवकडून घेतले होते. घेतलेली रक्कम वसुलीसाठी जाधव सूरजच्या घरी पोचला. पण, सूरजच्या घरामध्ये त्याचे वडील आजारी होते. कुटुंबातील सर्व जण चिंतेत असताना जाधव जाऊन पैशाचा तगादा सुरु केला. त्यामुळे सूरजने नंतर भेटू, असे सांगितले. पण, जाधव तेथून जाण्यास तयार नव्हता. यामुळे थोडा वेळ थांबा, बघू या काय करता येते, असे म्हणत जाधवला थांबवून घेतले. थोड्या वेळांनी दोघे तेथून एका दारुच्या दुकानामध्ये गेले आणि मद्य प्राशन केले.तेथून वडगावला रिक्षा स्टॅडजवळ आले. येथे जाधवने परत २ हजार रुपयांचा विषय काढला. त्यामुळे सूरजला राग आला आणि त्यांनी खिशातून रेडियम कटर काढून जाधवच्या गळ्यावर हल्ला केला. त्यात जाधवचा जागीच मृत्यू झाला.

हल्ल्यानंतर सूरजने तेथून पळ काढला. पण, बाजारपेठेत भरदिवसा झालेल्या खुनाच्या घटनेने खळबळ उडाली. लोकांची धावपळ उडाली. शहापूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून आरोपीचा शोध सुरु केला. सूरजला ताब्यात घेतले असून, २ हजार रुपयांवरून खून झाल्याची कबुली दिली. पुढील तपास सुरु आहे. शहापूर पोलिस पुढील तपास करत आहेत.

crime in junnar
CM Sangli Visit : केंद्राने 'NDRF' चे निकष सुधारावेत; ठाकरे

शुल्लक कारणावरून हल्ला

मयत महादेव जाधव आणि सूरज केदार हे दोघेही गंवडी काम करतात. त्यापैकी जाधव याची बहिण भारती या भारतनगरला आहेत. त्यांच्याकडे जाधव राहत. आज (ता.२) काम नसल्याने सकाळी महादेव जाधव पावणे आठच्या सुमारास घरातून बाहेर पडला. नाझर कॅम्प येथील केदार याच्या घरी पोचला. त्यानंतर उभयंतात किरकोळ कारणावरून वाद झाला आणि खुनाचे थरारनाट्य घडले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com