ग्राहकांचा ऑनलाइन शॉपिंगकडे कल; स्थानिक व्यवसायिक अडचणीत

दिवाळीत इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीला पसंती
online shopping
online shoppingsakal media

निपाणी : दिवाळीनिमित्त ई-कॉमर्स कंपन्या सूट देत आहेत. त्यामुळे निपाणी शहर, ग्रामीण भागातून ऑनलाइन खरेदीला ग्राहकांची पसंती मिळत आहे. ३० ते ४० टक्क्यांपर्यंत इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर विशेष सूट मिळत आहे. अवघ्या तीन ते चार दिवसांत वस्तू घरपोच मिळत असल्याने यंदाच्या दिवाळीत ऑनलाइन खरेदीत वाढ होताना दिसत आहे. परिणामी स्थानिक बाजारपेठेतील व्यवसायिक अडचणीत सापडले आहेत.

online shopping
Nipani : सुरेश पाटील यांची 'कृतिग्या हॅकथॉन`साठी निवड

अनेक नामांकित कंपन्यांचे कपडे, दागिने, भेटवस्तू, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, मोबाईल, पादत्राणेसारख्या हजारो वस्तू ऑनलाइन विक्री संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. खरेदी केलेल्या वस्तू तीन ते चार दिवसांत घरपोच मिळत आहेत. या वस्तूंमध्ये काही तांत्रिक अडचणी किंवा शंका असल्यास दहा दिवसांत ती वस्तू पुन्हा परत करता येत असल्याने ग्राहकांमध्ये ऑनलाइन खरेदी सुरक्षित बनली आहे. ऑफर्स आणि सूट मिळत असल्याने खरेदीसाठी उत्तम पर्याय म्हणून ऑनलाईन शॉपिंग कंपन्या ग्राहकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. दिवाळीतील भेटवस्तू, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, कपड्यांच्या ऍक्सेसरीज, तयार कपडे, गृहोपयोगी वस्तू, संगणक, टीव्ही, लॅपटॉप, खेळणी, दागिने, सौंदर्यप्रसाधने, आरोग्य उत्पादनांची विक्री होत आहे. सर्वाधिक विक्रीही मोबाईल, ऍक्सेसरीज, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची होत आहे. त्यावर सुमारे ४० टक्क्यांपर्यंत सवलती दिल्या जात आहेत.

online shopping
मनसे अध्यक्ष राज ठाकरे कृष्णकुंज सोडणार

तरुणाईकडून जास्त मागणी

दिवसातील अधिक वेळ तरुणाई इंटरनेटवर व्यस्त असते. त्यामुळे ऑनलाइन खरेदीमध्ये तरुणांची संख्या जास्त आहे. दिवाळीनिमित्त ऑनलाइन शॉपिंगवर विशेष सवलती मिळत आहे. त्यामुळे घरबसल्या खरेदी करण्यात तरुणाईचा कल अधिक आहे.

'स्थानिक बाजारपेठेपेक्षा ऑनलाईन खरेदी कमी खर्चात होत आहे. त्यामुळे सर्वांचाच कल अशा खरेदीकडे वाढला असून आपणही ऑनलाइन पद्धतीने कपडे खरेदी केले आहेत.'

-विक्रम जाधव, नागरिक, निपाणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com