कारला वाचविण्याच्या नादात कंटेनर झाला पलटी

अशपाक पटेल
रविवार, 12 ऑगस्ट 2018

खंडाळा : पुणे-बंगलुर महामार्गावर पुण्याकडे जाताना खंबाटकी घाटाच्या एस आकाराच्या वळणावर कोल्हापूर वरुन मुबंईला जाणारा कंटेनर (गाडीक्रमांक एम-एच 46 एआर 7751) हा पलटी झाला. या अपघातामध्ये चालक सुरज हरिंचंद्र यादव वय 40 हा गंभीर जखमी झाला असुन सध्या ग्रामीण रुग्णालयातुन खाजगी दवाखान्यात हलविण्यात आले आहे.

गेले महिनाभरात दर आठवड्यास येथे अपघात होत असुन, नेमके याच ठिकाणी हळद घेऊन जाणारा मालट्रक पलटी होऊन दोघे जण गंभीर जखमी झाले होते,
या अपघातावेळी महामार्गावर पडलेली हळद एवढ्या पावसातही धुऊन ही गेली नसताना लगेचच दुसरा अपघात येथे झाला.

या अपघातामध्ये कंटेनर हा ट्रकची चासी सोडुन महामार्गावर पडला आहे.
एका कार, चालकास वाचविण्याच्या नादात हा अपघात घडला असे चालकाने, सांगितले. अपघातग्रस्त कंटेनर हा कठड्यास धडकल्याने अडकुन राहिला आहे.
तसेच मागील आठवड्यातच एस कॉर्नरवरच टँकरला पाठीमागुन धडक देऊन ट्रक पलटी होऊन तिघे जखमी झाले होते. म्हणून येथे अपघाताची मालिका घडत आहे.

यामध्ये जीवितहानी बरोबर गाडीचे ही मोठे नुकसान होत असुन वाहतूकीचा ही खोळंबा होत आहे, घटनास्थळी हायवे पोलिस व खंडाळा पोलिस तत्काळ हजर झाले. माञ वाहतूक सध्या सुरळीत सुरु आहे,

Web Title: The container accident into while trying to save a car