नगरमध्ये या ३९ गावांतील पाणवठे दूषित

दौलत झावरे
Tuesday, 28 April 2020

जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा व भूजल विभागाकडून दर महिन्याला तपासल्या जाणाऱ्या दूषित पाण्याच्या नमुन्यांची संख्या वाढत आहे. मार्चमध्ये तपासलेल्या 1092 नमुन्यांपैकी 53 नमुने दूषित आढळले होते. दूषित पाण्याची टक्केवारी 4.57 वर गेली आहे

नगर ः मागील महिन्यात जिल्ह्यातील जलस्त्रोतातील 1092 नमुने तपासण्यात आले. त्यांत 39 गावांतील 53 नमुने दूषित आढळून आले. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून नियमित पाणीनमुने तपासले जातात. पाणी दूषित आढळल्यास संबंधित ग्रामपंचायतींना सूचना केल्या जातात. वर्षभरात जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील विविध गावांतील पाण्याच्या 23 हजार 87 नमुन्यांची तपासणी केली. त्यांत 1236 नमुने दूषित असल्याचा अहवाल आला. 

हेही वाचा - विदर्भ, मराठवाड्यातील कामगार परतीच्या वाटेवर

जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा व भूजल विभागाकडून दर महिन्याला तपासल्या जाणाऱ्या दूषित पाण्याच्या नमुन्यांची संख्या वाढत आहे. मार्चमध्ये तपासलेल्या 1092 नमुन्यांपैकी 53 नमुने दूषित आढळले होते. दूषित पाण्याची टक्केवारी 4.57 वर गेली आहे. संगमनेर तालुक्‍यात 10 गावांतील पाण्याचे 12 नमुने दूषित आढळले. त्याखालोखाल पारनेर तालुक्‍यात चार गावांतील तब्बल 11 नमुने दूषित आढळून आले, तर राहुरी, जामखेड व नेवासे तालुक्‍यांत पाण्याचा एकही नमुना दूषित आढळून आला नाही. या तिन्ही तालुक्‍यांत एकूण 147 नमुने तपासण्यात आले. 

दूषित पाणी आढळलेली गावे 
पारनेर ः भाळवणी, भांडगाव, वडगाव, ढवळपुरी. अकोले ः केळी, कोतूळ, पिंपरदरी. नगर ः नारायणडोहो, उक्कडगाव. संगमनेर ः खळी, कोळवाडा, अंभोरे, जवळे कडलग, जाखुरी, हंगेवाडी, चणेगाव, वडगाव पान, तळेगाव, शेडगाव. शेवगाव ः घोटण. पाथर्डी ः रांजणी, जांभळी, राघूहिवरे. श्रीगोंदे ः पिंपळगाव पिसा, एरंडोली, विसापूर, येवती, गव्हाणेवाडी, राजापूर, टाकळी कडेवळीत, चांडगाव. कोपरगाव ः कारवाडी, तळेगाव मळे, आपेगाव, उक्कडगाव. कर्जत ः गणेशवाडी, सिद्धटेक, राहाता ः ममदापूर, दहिगाव कोऱ्हाळे, श्रीरामपूर ः लाडगाव. 

तालुकानिहाय तपासलेले नमुने 
(कंसात दूषित नमुन्यांची संख्या) ः 
पारनेर : 91 (अकरा), अकोले : 142 (दोन), नगर : 83 (चार), संगमनेर : 119 (बारा), शेवगाव : 39 (एक), पाथर्डी : 120 (शून्य), राहुरी : 17 (शून्य), श्रीगोंदे : 95 (आठ), कोपरगाव : 84 (चार), कर्जत : 72 (दोन), नेवासे : 85 (शून्य), राहाता : 48 (दोन), श्रीरामपूर : 52 (69), जामखेड ः सात (चार). 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Contaminated water in 39 villages in Ahmednagar