उपायुक्तांच्या अंगावर ठेकेदाराने पैसे फेकले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

नगर - विकासकामांच्या प्रस्तावावर सही न केल्याच्या रागातून ठेकेदाराने सोमवारी प्रभारी उपायुक्त दिगंबर कोंडा यांच्या अंगावर पैसे व कामांचे प्रस्ताव (फायली) फेकून दिले. याबाबत तोफखाना पोलिसांनी ठेकेदार शाकीर शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

दिगंबर कोंडा यांनी फिर्याद दिली. त्यानुसार महापालिका कार्यालयात कोंडा काम करीत असताना, सायंकाळी साडेचार वाजता ठेकेदार शाकीर शेख आत आला. "माझ्या विकासकामांच्या प्रस्तावावर सही केली का,' अशी विचारणा त्याने केला. त्यावर कोंडा म्हणाले, की महत्त्वाच्या कामासाठी शनिवारी मंत्रालयात गेलो होतो. रविवारी सुटी होती. महापौर कार्यालयात सोमवारी सकाळी बैठक होती. त्यामुळे काम पाहण्यासाठी साइटवर जाता आले नाही. काम पाहिल्यानंतर सही करतो.'

त्यानंतर कोंडा यांच्या टेबलवरील कामाची फाइल घेऊन शेख बांधकाम विभागात गेला. तेथेही त्याने शिवीगाळ करून गोंधळ घातला. पुन्हा माझ्या कार्यालयात येऊन कामाचे प्रस्ताव व पैसे अंगावर फेकून लाच देण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: contractor money throw on deputy commissioner crime