दलित वस्तीची कामे अपूर्ण ठेवलेल्या ठेकेदारांची नावे काळ्या यादीत

नागेश गायकवाड
शुक्रवार, 6 जुलै 2018

आटपाडी (सांगली) : ठेकेदार कोणत्याही नेत्यांचा पाठिराखा असो दलित वस्तीची वर्षभर कामे न केलेल्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचे आदेश समाज कल्याण सभापती ब्रम्हदेव पडळकर यांनी येथे घेतलेल्या आढावा बैठकीत दिला.                            

आटपाडी (सांगली) : ठेकेदार कोणत्याही नेत्यांचा पाठिराखा असो दलित वस्तीची वर्षभर कामे न केलेल्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचे आदेश समाज कल्याण सभापती ब्रम्हदेव पडळकर यांनी येथे घेतलेल्या आढावा बैठकीत दिला.                            

येथील पंचायत समितीच्या सभागृहात समाजकल्याण सभापती पडळकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी गटविकास अधिकारी मिनाताई साळुंखे, झेडपी सदस्य मोहन रणदिवे, उपसभापती तानाजी यमगर आणि अधिकारी उपस्थित होते. बैठकत सुरूवेतीला दलितवस्ती योजनेच्या कामाचा गावनिहाय आढावा घेतला. बहुतांश गावची कामे रखडलेली आहेत. यावर पडळकर यांनी तीव्रशब्दात नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, 'दलितवस्तीची अपूर्ण कामे ठेवलेल्या गावांना यापुढे काम पूर्ण केल्याशिवाय निधी दिला जाणार नाही.

अपूर्ण कामाचा मला त्रास होतो. चार कोटी निधी कसा आणणार, जे ठेकेदार झोपलेत त्यांना जागे करा. ते कूणाचेही नसतात. कोणाचाही मुलाहीजा न ठेवता कारवाई करा.' यावेळी पंचायत समिती सदस्य दादासो मरगळे, रूपेशकुमार पाटील, हरीराम गायकवाड, डाॅ. भूमिका बेरगळ, पुष्पा सरगर, अधिकारी, ग्रामसेवक आणी सरपंच उपस्थित होते.                  

Web Title: contractors who are incomplete work of dalit colonies are in black list