पारधी समाजाच्या स्थैर्यासाठी पाटील बंधूंचे योगदान 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट तालुक्यातील तोरणी येथील माजी सरपंच अमृत पाटील आणि शरणू पाटील या बंधूनी समाजातील उपेक्षित पारधी बांधवांच्या घरकुलासाठी आपली 20 गुंठे जमीन दान देऊन त्यांना स्थैर्य प्राप्त करून दिली आहे. यामुळे रस्त्यावर खडी फोडून त्याच ठिकाणी आपल्यासाठी निवारा बनविलेल्या पारधी कुटुंबियांना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या अमूल्य सहकार्य आणि नियोजनाने एकूण त्यातील 14 कुटुंबियासाठी शासकीय घरकुले बांधून पूर्ण केली आहेत.

त्यातील 10 कुटुंबांना मागील आठवड्यात घरकुलाचे हस्तांतरण करण्यात आले. त्यांच्या डोक्यावर कायमस्वरूपी छत निर्माण झाल्याने त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. पारधी समाज समाज म्हणजे समाजमनात कायस्वरूपी संशयी नजरेतून वावरावे लागणारी कुटुंबे, त्यात कुठे वाईट घटना घडल्या तर पहिल्यांदा संशयाची सुई याच लोकांकडे वळत असे.

काही जण करणार आणि त्याचा त्रास मात्र सर्वांना ठरलेलाच असे. अशातच 1984 पासून मैंदर्गीत राहणारी व रस्त्याच्या कामासाठी दगड फोडून जीवन कंठित करणारे हे पारधी समाजातील कुटुंबीय होते. यांचा संपर्क सार्वजनिक बांधकाम खात्यात हजेरी सहाय्यक म्हणून काम पाहणारे तोरणीचे शरणू पाटील आणि त्यांचे बंधू अमृत पाटील यांच्याशी कामानिमित्त सतत येत होता.त्याचवेळी त्या कुटुंबांनी पाटील बंधुकडे कायमस्वरूपी राहण्यासाठी त्यांची जागा मोफत मागितली होती.त्यांना सहाय्यक अभियंता सुनील कटकधोंड यांनी मार्गदर्शन केले.

पाटील बंधूनी स्पष्ट केलं की जर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राजेंद्र भारुड हे जर या कुटुंबाना शासकीय घरकुल बांधून देणार असतील तर आपण त्यांना जागा दान करू. या बाबीस डॉ.राजेंद्र भारुड यांनी सत्वर होकार दिला आणि पाटील यांनी तोरणी ते सलगर मुख्य रस्त्यावरील आपली 
जागा दान दिल्यानंतर त्यात सुंदर अशी 14 घरकुले बांधून तयार झाली आणि त्यातील दहा घरांचे हस्तांतरण देखील पूर्ण झाले. 

या सर्व पारधी कुटुंबांचे नवीन घरात पुनर्वसन करण्यात आले.आपल्या शेतातील बांधावरील एकेक झाडांसाठी आणि इंच इंच जमिनीसाठी मी तू होणाऱ्या या काळात आपल्याच भागात राहणाऱ्या उपेक्षित पारधी कुटुंबाना आपली स्वतःची २० गुंठे जमीन दान देणाचे औदार्य दाखविणाऱ्या पाटील कुटुंबियांचा आदर्श मात्र इतरांनी घेण्यासारखे आहे.

Web Title: contribution of land of two brothers for paradhi communuty