काम सोडून फिरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आता चाप 

विजयकुमार सोनवणे
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

सोलापूर : महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी जागेवर नसतात अशा तक्रारी वाढल्या आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर सर्व कर्मचाऱ्यांना जीपीआरएस घड्याळ देण्यात येणार आहे. त्यामुळे ते कोणत्या वेळी कुठे आहेत याची माहिती मिळणार आहे.  

सोलापूर : महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी जागेवर नसतात अशा तक्रारी वाढल्या आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर सर्व कर्मचाऱ्यांना जीपीआरएस घड्याळ देण्यात येणार आहे. त्यामुळे ते कोणत्या वेळी कुठे आहेत याची माहिती मिळणार आहे.  

सध्या घंटागाड्यांवर जीपीआरएस बसविले आहेत. त्यामुळे त्याचा चांगला परिणाम दिसत असून, कोणती घंटागाडी कुठे आहे याची इत्यंभुत माहिती मिळत आहे. पालिकेचे कर्मचारी कामाच्या नावाखाली कुठेही फिरत असतात अशा तक्रारी नेहमीच ऐकायला मिळतात, त्याचीच गांभीर्याने दखल आयुकानी घेतली आहे. शहरातील बागा आणि काही संवेदनशील भागात फिरण्यासाठी "बाऊन्सर' नियुक्त केले आहेत. त्यांनाही ही घड्याळे दिली जाणार आहेत. त्यानंतर कर्मचारी व अधिकाऱ्यांना घड्याळे दिली जातील.

"ई' सकाळच्या प्रतिक्रियेची त्वरीत दखल 
ऑनलाईन कर भरल्यास सहा टक्के सूट ही बातमी  "ई सकाळ'वर प्रसिद्ध झाली. त्यावर नेताजी माने या सोलापूरकराने, बिलच मिळाले नाही तर सवलत कशी घेणार. बिले वाटण्याऐवजी महापालिकेचे कर्मचारी घरची कामे करीत फिरत असतात. त्यांना पोसण्याचे काम महापालिका करीत आहे. बिल घेण्यासाठी महापालिकेत या, असे सांगितले जाते. त्यासाठी पैसे मागितले जातात, अशी प्रतिक्रिया नोंदवली. त्याची माहिती आयुक्ताना  दिल्यावर त्यांनी त्याची गांभीर्याने दखल घेतली व कर संकलन विभागाला सूचना दिल्या. त्यानुसार हद्दवाढ विभागाचे अधीक्षक सुनील माने यांनी त्वरित परिपत्रक काढून, कामाऐवजी इतर ठिकाणी कर्मचारी फिरत असतील तर कारवाईचा इशारा दिला आहे.

Web Title: control on teachers of municipal corporation school in solapur