माळेवाडीत 'त्या' वादग्रस्त रेशन दुकानाचा परवाना अखेर रद्द 

Controversial ration shop license in Malewadi finally canceled
Controversial ration shop license in Malewadi finally canceled

आटपाडी : माळेवाडी (ता. आटपाडी) येथील वादग्रस्त ठरलेले म्हाळसांकात ग्राम विकास मंडळाच्या स्वस्त धान्य दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची कारवाई जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांनी आज केली. तपासणीतील तफावतीनुसार 16 हजार 556 रुपये शासनाकडे जमा करण्याचा आदेश देण्यात आला. 

माळेवाडी येथील म्हाळसंकात ग्राम विकास मंडळ अनेक वर्षापासून रास्त भाव दुकान चालवते. दुकानासंबंधी महसूल व पुरवठा विभागाकडे ग्रामस्थांनी अनेक वेळा लेखी तक्रारी केल्या होत्या. शासकिय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अशासकीय सदस्य उत्तम बालटे यांनीही पुराव्यासह तक्रार केली. तक्रारीच्या आधारे पुरवठा निरीक्षक यू. एन. हेरले यांनी 24 नोव्हेंबर रोजी तपासणी करून अहवाल जिल्हा पुरवठा विभागाकडे पाठवला. 

दर्शनी भागात दुकानाचा फलक नसणे, नोंद वही दुकानात नसणे, शिल्लक साठ्याची फलकावर नोंद नसणे, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या नोंडी, दुकानातील रजिस्टर मधील युनिट, कार्ड संख्या आणि लाभार्थी ऑनलाइन प्रमाणे नसने, धान्य तपासणीमध्ये मोठी तफावत आढळणे तसेच संस्थेच्या दुकानातील धान्याची विक्री करणारी व्यक्ती संस्थेने नेमलेली नाही आदि दोष काढून जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचा आदेश जिल्हा पुरवठा विभागाचे अधिकारी वसुंधरा बारवे, आटपाडी महसूल विभागातील पुरवठा विभागाला आज लेखी स्वरूपात दिले. 

माळेवाडीतील स्वस्त धान्य दुकानाबद्दल तक्रारी होत्या. तपासणी करून अहवाल जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे सादर केला. आज जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दुकानाचा कायमस्वरूपी परवाना रद्द करण्याचा लेखी आदेश पुरवठा विभागाला दिलेत. 
- यु. एन. हेरले, पुरवठा निरीक्षक


संपादन : प्रफुल्ल सुतार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com