बच्चू कडूंच्या वक्तव्यावरून सोलापूर महापालिका सभेत गोंधळ

bacchu kadu
bacchu kadu

सोलापूर : आमदार बच्चू कडू यांनी सोलापूर महापालिकेत आता कानपट्टीत मारण्यासाठीच येऊ, अस वक्तव्य केले होते. त्यावरून आज सोमवारी
झालेल्या महापालिकेच्या सभेत गोंधळ झाला. कांग्रेसचे चेतन नरोटे व भाजपचे सुरेश पाटील यांनी या प्रकरणी कडू यांचा निषेध झाला पाहिजे
अशी मागणी केली, तर शिवसेनेच्या गुरुशांत धुत्तरगावकर यांनी वर्षानुवर्षे अधिकाऱ्यांनी काम न केल्यामुळे आमदार कडू यांना हे वक्तव्य करावे लागले, पण ते आयुक्तांना उद्देशू नव्हते, असे सांगितले.

गेल्या आठ वर्षांत सुमारे 20 कोटी रुपयांचा निधी दिव्यांगांसाठी तरतूद करण्यात आला होता. मात्र फक् अडीच कोटी रुपयेच खर्च करण्यात आले. दरवर्षी तरतूद केलेली रक्कम का खर्च केली नाही, असा प्रश्न उपस्थित करीत कडू यांनी महापालिका आयुक्त आणि कामगार कल्याण अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

त्यानंतर पत्रकारांशी बोलताना, निधी खर्चण्यासाठी तीन महिन्यांची मुदत दिली आहे, या कालावधीत निधी खर्च झाला नाही तर मग थेट कानपट्टीतच मारायला येऊ, असे वक्तव्य त्यांनी केले होते. या घडामोडींशी संबंधित नरोटे यांनी लक्षवेधी उपस्थित करीत, कडू यांच्या संदर्भातील प्रश्न उपस्थित केला. कुणीही यावे मारून जावे, अशी महापालिकेची स्थिती झाली आहे, असे नरोटे म्हणाले. त्यांना धुत्तरगावकर यांनी हरकत घेतली. ते म्हणाले, आमदार बच्चू कडू यांना असे म्हणण्याची वेळ का आली याचाही विचार झाला पाहिजे. वारंवार सांगूनही कामे न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जात नाही, तरतूद असूनही दिव्यांगांसाठी निधी खर्च होत नाही, अशा अधिकाऱ्यांचे कौतुक करायचे का दरम्यान श्री. पाटील यांनीही या प्रकरणी कडू यांचा निषेध केला पाहिजे, अशी मागणी केली, त्याचवेळी कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, असेही ते म्हणाले.

या मागण्यांची दखल घेत महापौर शोभा बनशेट्टी यांनी, या प्रकरणात दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर निश्चि कारवाई होईल. तसेच शासकीय योजना लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोचल्याच पाहिजे, असे निक्षून सांगत, कामचुकार अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे स्पष्ट केले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com