अडचणी आल्या तर शपथ पुन्हा पुन्हा आठवा : संजय सक्‍सेना

अडचणी आल्या तर शपथ पुन्हा पुन्हा आठवा : संजय सक्‍सेना

सोलापूर : पोलिसांनी सद्‍रक्षणाय..खलनिग्रहणाय हे आपले बिद्र कायम लक्षात ठेवावे. आयुष्यात कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्या तरी डगमगाचे नाही. प्रशिक्षणादरम्यान घेतलेली शपथ पुन्हा पुन्हा आठवून सकारात्मक मार्ग काढायचा असा मौलिक सल्ला अपर पोलिस महासंचालक संजय सेक्‍सना यांनी दिला.

केगाव येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात शनिवारी 680 नवप्रविष्ठ पोलिसांचा दीक्षांत संचलन सोहळा उत्साहात पार पडला. याप्रसंगी मार्गदर्शन करताना अप्पर पोलिस महासंचालक सक्‍सेना बोलत होते. याप्रसंगी पोलिस आयुक्त महादेव तांबडे, पोलिस अधीक्षक मनोज पाटील उपस्थित होते.

पोलिस सेवेत प्रशिक्षणाला महत्त्व आहे. दहा महिन्याच्या प्रशिक्षणादरम्यान तुमचे सहकारी मित्रांशी मैत्रीचे नाते जोडले गेले आहे. सोशल मीडीयाच्या माध्यमातून तुम्ही यापुढेही एकमेकांना भेटत राहू शकता. वेगवेगळ्या ठिकाणी नियुक्‍त्या असल्या तरी मैत्री टिकवून ठेवा. आयुष्यात आनंदी राहायचे असेल फिटनेस चांगले ठेवा, असेही अपर पोलिस महासंचालक सक्‍सेना यांनी मार्गदर्शन सांगितले.

उत्तम प्रकारे प्रशिक्षण देऊन शारीरिक व मानसिकरीत्या सक्षम असलेले पोलिस घडविण्यात आल्याचे प्राचार्य कविता नेरकर-पवार यांनी प्रास्ताविकात सांगितले. याप्रसंगी उपप्राचार्य रामकृष्ण भोसले, शीतल वंजारी, पोलिस निरीक्षक राजेंद्र टाकणे, पोलिस उपनिरीक्षक बळवंत नारायणकर उपस्थित होते.

सर्वोकृष्ट प्रशिक्षणार्थी प्रमुख सुनील केकाणे (मुंबई रेल्वे), द्वितीय अभिषेक मुक्ताचे (लातूर), तृतीय धनंजय मारकड (मुंबई रेल्वे) तसेच गोळीबारमध्ये प्रथम साहेबराव मोरे (अकोला), द्वितीय बळवंत साबळे (ठाणे शहर) यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट संचलनानंतर नवप्रविष्ठ पोलिसांनी लेझीमचे डाव सादर केले. आदिवासीने नृत्याने साऱ्यांमध्येच उत्साह संचारला होता. कराटे प्रात्यक्षिकातून पोलिसांच्या धाडसाने दर्शन झाले. दीक्षांत संचालन पाहण्यासाठी नवप्रविष्ठ पोलिसांचे कुटुंबीय उपस्थित होते. 

सामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी सज्ज रहा. आपणही सामान्य माणूस आहोत हे विसरू नका. रस्त्यावर, पोलिस ठाण्यात सर्वांशी आपुलकीने वागा. घेतलेली शपथ विसरू नका. 

- संजय सक्‍सेना, अपर पोलिस महासंचालक 

नऊ महिन्याचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. दीक्षांत संचलन पाहण्यासाठी माझे कुटुंबीय आले आहे. प्रशिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाच्या आधारे सक्षम पोलिसिंग करण्याचा आमचा प्रयत्न राहील. 

- सुनील केकाणे, सर्वोकृष्ट प्रशिक्षणार्थी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com