हळद शिजविण्याच्या कुकरचा स्फोट 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जानेवारी 2017

सातारा : वाई तालुक्‍यातील फुलेनगर येथे हळद शिजविण्याचे काम सुरू असताना कुकरचा स्फोट झाला. हळद शिजविण्यासाठी लागणाऱ्या कुकरच्या बॉयलरचा आज सकाळी दहाच्या सुमारास स्फोट होऊन अल्पवयीन मुलासह चारजण गंभीर भाजून जखमी झाले आहेत. बॉयलर शंभर फुट उडाला. यामध्ये सिध्दाप्पा मालाप्पा बग्गे(वय 27), मंजुनाथ सिध्दाप्पा साक्‍से (वय 30), राजप्पा रेवय्या मठपती (वय 30), निखिल आनंदा अडसुळ (वय 16) यांचा समावेश आहे. यातील सिध्दाप्पा बग्गे गंभीर असून त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. 

Web Title: cooker accident

टॅग्स