जोतिबा डोंगरावर मंदिराभोवती कुल कोट

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 एप्रिल 2019

जोतिबा डोंगर - श्रीक्षेत्र जोतिबा डोंगर येथे चैत्र यात्रेला प्रारंभ झाला आहे. या यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना उन्हाचा त्रास होतो. दगडी फरशीमुळे पायांना चटके बसतात. भाविकांना होणारा हा त्रास कमी करण्यासाठी यंदा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने मुख्य मंदिराच्या सभोवती  कुल कोट मारला आहे.

गेल्या वर्षीच्या चैत्र यात्रेतही देवस्थान समितीने कुल कोट मारला होता. पण गुलालातील केमिकल व येथील हवामानामुळे हा कूल कोट पावसाळ्यात खराब झाला होता. त्यामुळे यंदा ही  हा कुल कोट नव्याने मारण्यात आला आहे.

जोतिबा मंदिर परिसरात बेसॉल्ट प्रकारातील काळा दगड असून त्याच्या दगडी फरशी सर्वत्र बसविली आहे. या फरश्या कडक उन्हामुळे तापतात. त्यावरून चालणे भाविकांना त्रासदायक होते. भाविकांच्या पायाला फोड येतात. हा त्रास कमी व्हावा यासाठी कुल कोट मारावा, अशी मागणी भाविकांतून होत होती.

Web Title: Cool cote in Jotiba temple Kolhapur