सहकार मंत्र्यांनी माफी न मागितल्यास जोडे मारो आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 एप्रिल 2018

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी लातूर येथील एका सभेत समाज बांधवांची कुचेष्टा करणारे वक्तव्य केले.

सोलापूर - सोलापूर विद्यापीठाला सिध्देश्‍वरांचे नाव देण्याची मागणी वीरशैव लिंगायत समाजाने केली आहे. या संदर्भात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी लातूर येथील एका सभेत समाज बांधवांची कुचेष्टा करणारे वक्तव्य केले. यामुळे समाज बांधवांचा अपमान झाला असून सहकार मंत्र्यांनी दोन दिवसात माफी मागावी, असा इशारा शिवा संघटनेचे डॉ. बसवराज बगले, शहराध्यक्ष संतोष केंगनाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिला. 

शिवा संघटनेच्या आंदोलनाला यश मिळाल्याने भाजप मंत्र्यांच्या पाया खालची वाळू घसरली आहे. त्यामुळेच त्यांनी विद्यापीठ नामांतर बद्दल वक्तव्य केले. सहकारमंत्र्यांनी दोन दिवसात माफी न मागितल्यास जिल्हाभर जोडे मारो आंदोलन करण्यात येणार आहे. 

प्रत्येक कार्यालयात बसव जयंती साजरी करावी 
राज्य शासनाने राज्यातील सचिव कार्यालयापासून तलाठी कार्यालयापर्यंत सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात महात्मा बसवेश्‍वर यांची जयंती साजरी करण्याचा शासन निर्णय जारी केला आहे. असे असताना ही अनेक कार्यालयाकडून याची अंमलबजावणी केली जात नाही. सर्व शासकीय कार्यालयात महात्मा बसवेश्‍वर यांची प्रतिमा लावून जयंती साजरी करावी असे परिपत्रक काढावे अन्यथा संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या तोंडाला काळे फासून कार्यालयास टाळे ठोकण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. 
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

  • 'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.
  • शेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.
  • राजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.
Web Title: cooperation minister should apologize for use insulting words