सहकारमंत्र्यांचा आगळावेगळा ऋणानुबंध

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 ऑगस्ट 2016

सोलापूर - कोणत्याही निवडणुका म्हटले की सूडाचे राजकारण आलेच. मात्र, या पूर्ण संकल्पनेला फाटा देत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी माजी मुख्यमंत्री (कै.) यशवंतराव चव्हाण यांनी सुरू केलेली; परंतु खंडित झालेली "ऋणानुबंधाची‘ परंपरा पुन्हा सुरू केली आहे. 1997च्या विधानपरिषद निवडणुकीतील मतदारांचा स्नेहमेळावा घेऊन सहकारमंत्र्यांनी एक आगळावेगळा "ऋणानुबंध‘ सोहळा आज साजरा केला. 

 

सोलापूर - कोणत्याही निवडणुका म्हटले की सूडाचे राजकारण आलेच. मात्र, या पूर्ण संकल्पनेला फाटा देत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी माजी मुख्यमंत्री (कै.) यशवंतराव चव्हाण यांनी सुरू केलेली; परंतु खंडित झालेली "ऋणानुबंधाची‘ परंपरा पुन्हा सुरू केली आहे. 1997च्या विधानपरिषद निवडणुकीतील मतदारांचा स्नेहमेळावा घेऊन सहकारमंत्र्यांनी एक आगळावेगळा "ऋणानुबंध‘ सोहळा आज साजरा केला. 

 

(कै.) लिंगराज वल्याळ यांच्या सांगण्याने 1997ची विधान परिषदेची निवडणूक लढविण्याचा निर्णय सहकारमंत्री देशमुख यांना घ्यावा लागला होता. त्या वेळी असलेल्या मतदारांसाठी येथील हेरिटेज येथे त्यांनी "ऋणानुबंध‘ मेळाव्याचे आयोजन केले होते. 1997च्या जवळपास 370 मतदारांना, त्यांचा कुटुंबीयांना या मेळाव्यासाठी निमंत्रण दिले होते. आजच्या या मेळाव्यासाठी सर्वच पक्षांतील नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामध्ये प्रामुख्याने शिवसेनेचे आमदार नारायण पाटील, माजी आमदार राजेंद्र राऊत, स्वाभिमानीचे नेते संजय शिंदे, शिवसेनेचे समन्वयक पुरुषोत्तम बरडे, सहसंपर्कप्रमुख धवलसिंह मोहिते-पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दीपक गायकवाड, पंढरपूर विभागाचे जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे, कॉंग्रेसचे दुधनीचे माजी नगराध्यक्ष सातलिंगप्पा म्हेत्रे, जिल्हा परिषद सदस्य शिवाजी कांबळे आदी उपस्थित होते. त्याचबरोबर व्यासपीठावर ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासी, भाजपच्या प्रवक्‍त्या श्‍वेता शालिनी, जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शहराध्यक्ष अशोक निंबर्गी, नगरसेवक नागेश वल्याळ, अविनाश महागावकर उपस्थित होते. 

सहकारमंत्री देशमुख म्हणाले, माझ्या त्या पहिल्या निवडणुकीत ज्यांनी मला मतदान केले, त्यांना मी उघडे पाडणार नाही. ज्यांनी मला मतदान केले, त्यांच्या मी नेहमीच ऋणात राहीन. त्याचबरोबर ज्यांनी मला मतदान केले नाही, त्यांच्याकडून पक्षाप्रती असलेली निष्ठा कशी सांभाळावीक्ष्‌ याचे मी अनुकरण करेन. आपण दिलेल्या मतदानामुळेच मी आमदाराचा नामदार झालो आहे. त्यामुळे आपल्या विश्‍वासाला तडा जाऊ देणार नाही. कुणाचाही विश्‍वासघात करणार नाही. सूडाचे राजकारण कधीही करणार नाही. सगळ्याच पक्षांतील लोकांनी मला सहकार्य करून तुमच्या ऋणातून उतराई होण्याची संधी देण्याचे आवाहन श्री. देशमुख यांनी केले. विकासकामांविषयी आपल्या काही सूचना असतील तर त्या जरूर सांगाव्यात. माझ्याकडे सहकार हे खाते दिले आहे. त्यामुळे सहकारातून समृद्धीकडे जाण्याचा कानमंत्र मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. त्यासाठी तुमच्या सहकार्याची गरज असल्याचेही श्री. देशमुख यांनी सांगितले. श्री. महागावकर यांनी आभार मानले. या वेळी श्री. पवार, जगदीश पाटील, भीमाशंकर बिराजदार, दिलीप सिद्धे, दीपक गायकवाड, प्रदीप बनसोडे यांनी मनोगते व्यक्त केली. 

"सूड अन्‌ द्वेष‘ 

आपल्याकडे फक्त सूडाचेच राजकारण होत नाही, तर द्वेषाचेही राजकारण होते. इतर पक्षांतील लोक सूडाचे तर स्वपक्षातील लोक द्वेषाचे राजकारण करत असल्याचे ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासी यांनी सांगितले. सहकारमंत्री देशमुख यांचे पाय जमिनीवर असल्याचे अनेक वक्‍त्यांनी सांगितले. मात्र, दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्यांच्याच पक्षातील लोक ते पाय ओढण्याचे प्रयत्न करत असल्याचे श्री. घळसासी यांनी स्पष्ट केले. 

Web Title: Cooperation ministers unique garnishment