राज्यातील सहकार क्षेत्रालाही दिवाळखोरी कायदा लागू करावा - शेखर चरेगावकर

विजयकुमार सोनवणे
शुक्रवार, 22 जून 2018

सोलापूर :"सहकार चळवळ टिकवून ठेवण्यासाठी राज्यातील सहकार क्षेत्रालाही केंद्र सरकारच्या धर्तीवर दिवाळखोरी कायदा लागू करावा अशी मागणी शासनाकडे करणार आहे'', असे राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर (राज्यमंत्री दर्जा) यांनी सांगितले. 

सोलापूर :"सहकार चळवळ टिकवून ठेवण्यासाठी राज्यातील सहकार क्षेत्रालाही केंद्र सरकारच्या धर्तीवर दिवाळखोरी कायदा लागू करावा अशी मागणी शासनाकडे करणार आहे'', असे राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर (राज्यमंत्री दर्जा) यांनी सांगितले. 

सहकार चर्चासत्रासाठी ते आज सोलापुरात आले होते. तत्पूर्वी त्यांनी "सकाळ'शी संवाद साधला. ते म्हणाले,""गुंतवणूकदारांचे नुकसान होऊ नये, कोणतीही संस्था आर्थिक डबघाईला येऊ नये यासाठी केंद्र सरकराने दिवाळखोरी कायदा लागू केला आहे. त्यामुळे अनेक कंपन्या व संस्थांनी त्यांच्यावर असलेले कर्ज तसेच देय रकमा तातडीने जमा केल्या आहेत. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही हा कायदा लागू करावा, अशी मागणी करणार आहे.'' 

शेतकऱ्यांना थेट कर्ज वाटप करण्यासंदर्भातही अहवाल तयार करण्यात येत आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार होण्यास मदत होणार आहे. सहकार क्षेत्रात आज 54 प्रकारच्या संस्था आहेत. मात्र कायदा सर्वांसाठी एकच आहे. तो बदलण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत, असेही श्री. चरेगावकर म्हणाले. 

भाजप सहकार चळवळ मोडीत काढत आहे, असा आरोप करणाऱ्यांनी, राज्य शिखर बॅंक कुणी बरखास्त केली याचे उत्तर द्यावे. ही बॅंक बरखास्त करताना तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते. त्यांच्यावर ही वेळ का आली याचे उत्तर श्री. चव्हाण यांनी दिले, तर भाजपवर केला जाणारा आरोप किती निराधार आहे, हे स्पष्ट होईल. 

राजकीय ईच्छाशक्तीअभावी पीककर्ज आणि शेतीपूरक कर्ज हे मुठभर लोकांना देण्यात आले. आता याच कर्जासाठी नागरी बॅंका व पतसंस्थातूनही शेतीपूरक कर्ज मिळण्याची सुविधा केलेली आहे. प्रत्येक नागरी बॅंक व पतसंस्थेने 20 टक्के कृषीकर्ज द्यावे, असे त्यांना सांगण्यात आल्याचेही श्री. चरेगावकर म्हणाले. 

यशवंतरावांचा आदर्श फोटोपुरता 
सहकार चळवळीतील प्रस्थापितांनी माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा आदर्श फक्त फोटोपुरता घेतला. त्यांचा एकही विचार अंमलात आणला असता तर सहकार चळवळ मोडीत निघाली नसती, असा चिमटाही श्री. चरेगावकर यांनी काढला. 

Web Title: cooperative field should also allow bankrupt law demand by shekhar charegaonkar