सहकार मंत्र्यानी यादी बदललेल्या 17 कोटीच्या प्रस्तावाला मुहुर्त
सोलापूर - सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी यादी बदलल्याच्या कारणावरून गदारोळ झालेल्या हद्दवाढ विभागात करावयाच्या 17 कोटींच्या कामांचा प्रस्ताव अखेर महापालिकेच्या विषयपत्रिकेवर आला आहे.
डिसेंबर महिन्याची सभा मंगळवारी (ता.11) होणार आहे. शासकीय निधीतून करावयाच्या 17 कोटींच्या कामाचा विषय आहे. महापालिका सभेत या निधीतून करायच्या कामांची यादी मंजूर केली असता, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी ती थेट शासनाकडून बदलून आणली आहे. शासनाने मंजूर केलेल्या यादीची माहिती देण्यापुरता हा विषय प्रशासनाकडून पाठविण्यात आला आहे. त्यामुळे या विषयावरून सभेत मोठा गदारोळ होण्याची शक्यता आहे.

माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड यांनी श्री. मिस्त्री यांनी अनधिकृत बांधकाम केल्याची तक्रार केली होती. त्याला अनुसरून निवडणूक कार्यालयाने तपासणीअंती तयार केलेला अहवाल सभागृहाकडे पाठविण्यात आला आहे. त्यावरही निर्णय अपेक्षित आहे. याशिवाय, जलशुद्धीकरण केंद्रावर सुधारणा करणे, सामुदायिक रक्षाबंधन आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा सन्मान करण्यासंदर्भातील महिला व बालकल्याण समितीचा कार्योत्तर मान्यतेसाठीचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.
अजेंड्यावरील काही प्रमुख विषय
-मराठा आरक्षणाचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पालकमंत्री विजय देशमुख व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना मानपत्र देणे.
- महिला ब बालकल्याण समितीच्य सदस्यांच्या इंदौर येथे जाणाऱ्या अभ्यास दौऱ्याला मंजुरी देणे
- विभागीय कार्यालयांसाठी पाईप खरेदी करणे
- कोंडवड्याशेजारी संरक्षक भिंत बांधणे
नगरसचिवांनी केली चूक दुरुस्त
डिसेंबरच्या विषयपत्रिकेतील चार प्रस्तावामध्ये मक्तेदार व तरतुदीचा उल्लेख नव्हता. याची गंभीर दखल सभागृह नेते संजय कोळी यांनी घेतली. या प्रकरणावरून नगरसचिव पी.पी. दंतकाळे यांना जाब विचारला, शिवाय निलंबन करण्याची तंबी दिली. त्यामुळे नगरसचिवांनी पुरवणीमध्ये आणखी एक चूक दुरुस्त करीत, दलित वस्तीच्या प्रस्तावामध्ये तरतूद आणि मक्तेदाराच्या नावाचा उल्लेख केला आणि तशी दुरुस्ती पुरवणीमध्ये प्रसिद्ध केली.