उंडवडी सुपेत ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारांसाठी चोरट्यांकडून तोडफोड

undavadi
undavadi

उंडवडी - उंडवडी सुपे (बारामती) येथील भाऊसाहेब पाझर तलावालगच्या ट्रान्सफॉर्मरची शुक्रवारी (ता. 2) रात्री अज्ञात चोरट्यानी तोडफोड करुन तांब्याच्या तारा चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र ट्रान्सफॉर्मरमध्ये अॅल्युमिनियमच्या तारा निघाल्याने चोरट्याने पळ काढला. 

येथील भाऊसाहेब पाझर तलावालगतच्या शेतीपंपाना वीजपुरवठा करणारा ट्रान्सफॉर्मर अज्ञात चोरट्यानी शुक्रवारी रात्री तोडला. दोन वर्षापूर्वी देखील हाच ट्रान्सफॉर्मर चोरण्याचा प्रयत्न झाला होता. त्यावेळीही अशा प्रकारचे नुकसान झाले होते. हा रोहित्र दुसऱ्यांदा चोरीला जाण्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे परिसरातील इतरही ट्रान्सफॉर्मर सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

आज सकाळी येथील उपसरपंच पोपट गवळी यांनी या घटनेची पाहणी करुन याबाबत महावितरणला कळविले. त्यानुसार महावितरणचे कर्मचारी वायरमन सुरेश कासदेकर यांनी घटनेची पाहणी करुन वडगाव निंबाळकर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. 

या घटनेत रोहित्रातील ऑईल, बुशींगा, कॉपरच्या तारा चोरट्यांनी तोडल्याने मोठे नुकसान झाले आहे. या रोहित्रावर पंधरा शेतीपंपाचा वीजपुरवठा अवलंबून आहे. सध्या या परिसरातील शेतकऱ्यांनी विहीरीच्या पाण्यावर चारा पिके घेतली आहे. या पिकांना पाण्याची आवश्यकता असल्याने येथील ट्रान्सफॉर्मर महावितरण कंपनीने तातडीने नव्याने बसवून वीजपुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे. 

याबाबत महावितरणचे सहाय्यक अभियंता डि. पी. ठोंबरे म्हणाले, " चोरट्यानी तांब्याच्या तारा नेहण्यासाठी तो रोहित्र तोडला. मात्र त्यामध्ये  ॲल्युमिनियमचे साहित्य निघाल्याने चोरट्यानी ते नेले नाही. मात्र प्रचंड नुकसान केले आहे. लवकरच त्या शेतकऱ्यांना नवीन रोहित्र देण्यात येईल." 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com