वाळवा तालुक्‍यात 25 जणांना कोरोना 

corona.jpg
corona.jpg

इस्लामपूर (सांगली) : वाळवा तालुक्‍यात आज सकाळच्या टप्प्यात 10 गावांमधील सुमारे 25 जणांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तालुका आरोग्य अधिकारी साकेत पाटील यांनी ही माहिती दिली. 

गेले काही दिवस नियंत्रणात असणाऱ्या वाळवा तालुक्‍याची परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे. तालुक्‍यातील रुग्णांची संख्या 229 वर पोचली आहे. 

आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये केदारवाडी येथील 9 जण पॉझिटिव्ह आले. त्यामध्ये तीन वर्षीय मुलगा व त्याच वयाच्या मुलीचा समावेश आहे. अन्य दोन महिला आहेत. वाटेगाव येथील 6 जण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यातही तीन महिलांचा समावेश आहे. इस्लामपूर शहर व काळमवाडी येथील प्रत्येकी दोन रुग्ण आहेत तर रेठरे हरणाक्ष, नेर्ले, सुरुल, बागणी, वाळवा व कुरळप येथील प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे. या दहा गावांमध्ये रुग्ण आढळलेल्या ठिकाणी आरोग्य विभाग व तालुका प्रशासनाच्या वतीने उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com