खानापूरवरही ड्रोन कॅमेऱ्याची नजर

corona condition dron camera khanapur
corona condition dron camera khanapur

खानापूर : शहरातील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यापासून मंगळवारपासून (ता. 14) स्थानिक पोलिसांनी ड्रोन कॅमेऱ्याची मदत घेण्यास सुरवात केली आहे. शहरातील विविध भागात हा प्रयोग करण्यात आला. कॅमेऱ्याच्या माध्यमातून शहरातील लोकांच्या हालचाली व लॉक डाऊनच्या स्थितीवर रोज ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने शहरावर नजर ठेवली जाणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक बसगौडा पाटील यांनी सांगितले. 

लॉक डाऊनची मुदत वाढल्यानंतर कंटाळलेले लोक घराबाहेर पडून एकत्र जमत असल्याचे प्रकार दिसत आहेत. शहरातील स्थिती हळूहळू तणावपूर्ण बनत आहे. त्याशिवाय संशयास्पद हालचाली वाढल्या आहेत. आधीच पोलीसबळ अपुरे असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी बंदोबस्त ठेवणे कठीण बनले आहे. म्हणून शहरावर नजर ठेवण्यासाठी खानापूर पोलिसांनी ड्रोन कॅमेऱ्याची मदत घेतली आहे. मंगळवारी उपनिरीक्षक पाटील, पोलिस कर्मचारी सतीश मांग, जगदीश काद्रोळी यांनी प्रायोगिक तत्वावर दुर्गानगर, निंगापूर गल्ली, नाईक गल्ली आणि जळकावाडा या परिसराची पाहणी केली. बुधवारपासून (ता. 15) रोज दिवसभर शहरावर ड्रोनद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे. 

लॉक डाऊन असतांना शहरात बऱ्याच गल्ल्यांमध्ये तरुण एकत्र जमून क्रिकेट खेळत आहेत. मेजवान्या करीत आहेत. तसेच एकत्र नमाज पडत असल्याची शक्‍यताही वर्तविली जात असल्याने यावर ड्रोनद्वारे नजर ठेवली जाणार आहे. शहरासह इतर उपनगरांमध्येही हा उपक्रम राबविला जाणार असून नियमांची अंमलबजावणी करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. 

बाजारपेठेवरही लक्ष 
पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी शहरातील व्यापारी पहाटेपासूनच दुकाने उघडून बसत आहेत. त्याशिवाय लोक गर्दी करून नियमांची पायमल्ली करीत आहेत. त्यांच्यावरही ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. निर्धारित वेळत दुकाने उघडण्याची सूचना व्यापाऱ्यांना करण्यात आली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com