कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक कोरोना बाधित 

घनश्‍याम नवाथे
Monday, 10 August 2020

सांगली-  येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे मिरज पश्‍चिम भागातील एक संचालक कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. दहा दिवसांपूर्वी बाजार समितीतील एक शिपाई कोरोनाबाधित आढळला होता. त्यानंतर संचालकही बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे इतर संचालक आणि कर्मचाऱ्यांमध्ये धास्ती आहे. 

जिल्ह्यातील आजअखेर कोरोना बाधित रूग्णांची संख्या पाच हजाराच्या जवळपास पोहोचली आहे. शहरी व ग्रामीण भागात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये काहीसे भितीचे वातावरण आहे. येथील मार्केट यार्डात काही दिवसापूर्वी व्यापारी कोरोना बाधित असल्याचे आढळून आले आहेत. दहा दिवसापूर्वी एक शिपाई बाधित असल्याचे समजले होते. परंतू त्याचा अहवाल येण्यापूर्वी तो रजेवर होता. तरीही कर्मचाऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काही अपवाद वगळता इतर संचालकांनी येण्याचे टाळले आहे. मिरज पश्‍चिम भागातील संचालक कोरोनाबाधित असल्याचे आज स्पष्ट झाले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचा मुलगाही "पॉझिटिव्ह' आला होता. त्यानंतर संचालकही बाधित असल्याचा अहवाल आल्याने बाजार समिती खळबळ उडाली आहे.

बाजार समितीमध्ये शिपायानंतर आता एक संचालकही कोरोना बाधित आढळून आले आहेत. मार्केट यार्डात लॉकडाउननंतर दहा दिवसांपासून व्यवहार सुरु झाले आहेत. समितीमध्ये संचालक सध्या कामाव्यतिरिक्त येत नाहीत. तसेच अधिकारी आणि कर्मचारी सोशल डिस्टन्सिंग व इतर उपाययोजना करत असल्याचे सभापती दिनकर पाटील यांनी सांगितले. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona, director of the market committee, interrupted