"कोरोना'मुळे अंगारकीला बाप्पाच्या दर्शनाला विघ्न 

"Corona 'disrupts Bappa's darshan
"Corona 'disrupts Bappa's darshan

सांगली : कोरोना विषाणूचे संकट गहिरे होत असताना गर्दी होईल, या भीतीमुळे शहर व परिसरातील गणेश मंदिरे बंद ठेवण्याचे प्रशासनाचे आदेश होते. अंगारकीला भाविक-भक्‍तांना गणरायाचे दर्शन घेता आले नाही. प्रवेशद्‌वारातूनच विघ्नहर्त्याला कोरोनाचे संकट लवकर संपावे, असे साकडे घालत भक्‍तांनी प्रार्थना केली. दिवसभर मंदिर परिसरात गर्दी होती. मात्र पोलिस बंदोबस्तात भाविकांना दर्शन घ्यावे लागले. 

"कोरोना' मुळे गतवर्षी मार्च महिन्यांपासून पंचायतन संस्थानचे गणेश मंदिर कुलूपबंद होते. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरांचे कुलूप हटले. त्यानंतर अवघ्या दोन-तीन महिन्यात पुन्हा कोरोना विषाणू डोके वर काढू लागल्याने शासनाने सार्वजनिक सण, समारंभ, सभा, उत्सवावर निर्बंध आणले आहेत.

अंगारकी संकष्टी म्हणजे भक्‍तांसाठी पर्वणी असते. मंदिरात भाविकांची तुडुंब गर्दी असते. त्यानिमित्त बाजारपेठत मोठी उलाढाल होत असते. कोरोनाच्या सावटामुळे प्रथमच मंदिर बंद ठेवल्याने भक्‍त-भाविकांचा उत्साह जेमतेम होता. संस्थान गणेश मंदिरासह विश्रामबाग व इतर उपनगरातील मंदिरे बंद असल्याने घरीच पूजा, आरतीचे कार्यक्रम झाले. मंदिराला कुलूप असल्याने भाविकांनी बाहेरुनच दर्शन घेतले. 

पहाटेपासून भाविकांची होणारी गर्दी दिवसभर कायम होती. पोलिसांनी गर्दी टाळण्यासाठी भाविकांना रोखले. मास्कच्या सूचना पोलिस करीत होते. सायंकाळनंतर गर्दी वाढली. मंदिर प्रशासनानेही अत्यंत साधेपणाने पूजा, अर्चासह आरती विधी उरकले. 


संपादन : प्रफुल्ल सुतार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com