"कोरोना' चा फटका : भोपळ्यावर फिरवला रोटावेटर

"Corona ' effect : rotavator rotated on pumpkin
"Corona ' effect : rotavator rotated on pumpkin

इस्लामपूर : लॉकडाऊननमुळे शहरातील हॉटेल्स बंद झाल्याचा फटका भोपळा उत्पादकांना बसला आहे. माल शेतात सडून चालल्याने चिकूर्डे (ता. वाळवा) येथे विजयकुमार शंकर पाटील व सुरेश शंकर पाटील या शेतकऱ्यांनी दोन एकर शेतातील भोपळा पिकावर रोटावेटर फिरवला. लॉकडाऊनमुळे मोठे आर्थिक नुकसान झाल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. या अवस्थेत शेतकरी हतबल झाले आहेत. दाद कुणाकडे मागायची ? असा पेच आहे. त्यांना मदतीची गरज आहे.

चिकूर्डे (ता. वाळवा) येथील विजयकुमार शंकर पाटील व सुरेश शंकर पाटील यांनी 13 जानेवारीला दोन एकर शेतात सेंच्युरियन 1076 वाणाच्या भोपळ्याची लागवड केली होती. लागवडीसाठी त्यांना दीड लाख रुपये खर्च आला. भोपळा काढणी आला आणि "कोरोना'चा प्रादुर्भाव वाढला. 

22 मार्चला "कोरोना' व्हायरसला आळा घालण्यासाठी देशात पुकारलेल्या लॉकडाऊनमुळे शहरातील मोठी हॉटेले बंद झाली. भोपळा खरेदीकडे व्यापाऱ्यांनी पाठ फिरवली. तालुक्‍यातील काही शेतकरी काढलेला माल घेऊन मुंबईला गेले. परंतु मागणी नसल्याने त्यांना माल जाग्यावर टाकून माघारी परतावे लागले. उलट येण्याजाण्याचेही पैसे निघाले नाहीत. वाहतुकीचा खर्च अंगावर पडल्याने हतबल झालेल्या पाटील बंधूनी दोन एकरातील भोपळा पिकांवर रोटावेटर फिरवला. त्यांचे जवळपास सहा लाखांचे नुकसान झाले आहे. त्यांच्यासह सर्वच शेतकरी डोक्‍याला हात लावून बसले आहेत. या स्थितीत शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा भावना आहेत. 

मुंबईला व्यापाऱ्यांनी खरेदी केली नाही

लॉकडाऊन काळात काढलेला माल घेऊन मुंबईला गेलो. मोठी हॉटेल बंद असल्याने व्यापाऱ्यांनी खरेदी केली नाही. माल जाग्यावर टाकून परत आलो. वाहतुकीचा खर्चही अंगावर पडला. लाखोंचे नुकसान झाले आहे.

- विजयकुमार पाटील, चिकूर्डे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com