कोरोना बाधित 339 रूग्णांचा उच्चांक...सहाजणांचा मृत्यू : महापालिका क्षेत्रात सर्वाधिक 254 रूग्ण 

घनशाम नवाथे
Friday, 31 July 2020

सांगली-  जिल्ह्यात आज कोरोना बाधित रूग्णसंख्येचा आणखी एक उच्चांक नोंदवला गेला. दिवसभरात आज 339 रूग्ण बाधित असल्याचे निष्पन्न झाले. टाळेबंदी उठल्यानंतर आज पहिल्याच दिवशी आजअखेरची सर्वात उच्चांकी रूग्णसंख्या आढळली. महापालिका क्षेत्रात सर्वाधिक 254 रूग्ण आढळले. त्यामध्ये सांगलीतील 173 आणि मिरजेतील 81 रूग्णांचा समावेश आहे. तर दिवसभरात आज सहा रूग्णांचा मृत्यू झाला. आजच्या रूग्णसंख्येनंतर जिल्ह्यातील एकुण बाधित रूग्णसंख्या 2643 इतकी झाली आहे. 

सांगली-  जिल्ह्यात आज कोरोना बाधित रूग्णसंख्येचा आणखी एक उच्चांक नोंदवला गेला. दिवसभरात आज 339 रूग्ण बाधित असल्याचे निष्पन्न झाले. टाळेबंदी उठल्यानंतर आज पहिल्याच दिवशी आजअखेरची सर्वात उच्चांकी रूग्णसंख्या आढळली. महापालिका क्षेत्रात सर्वाधिक 254 रूग्ण आढळले. त्यामध्ये सांगलीतील 173 आणि मिरजेतील 81 रूग्णांचा समावेश आहे. तर दिवसभरात आज सहा रूग्णांचा मृत्यू झाला. आजच्या रूग्णसंख्येनंतर जिल्ह्यातील एकुण बाधित रूग्णसंख्या 2643 इतकी झाली आहे. 

जिल्ह्यात गेल्या दहा दिवसात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढतच चालली आहे. आरटीपीसीआर आणि ऍन्टीजेन चाचतीतून रूग्ण वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये धास्ती आहे. दहा दिवसात अडीच हजार नवे रूग्ण आढळले आहेत. आज वासुंबे (ता. तासगाव) येथील 62 वर्षाचे वृद्ध, कर्नाळ (ता. मिरज) येथील 86 वर्षाचे वृद्ध, मिरजेतील 70 वर्षाचे वृद्ध, भोसे (ता. मिरज) येथील 75 वर्षाची वृद्धा, खटाव (ता. पलूस) येथील 60 वर्षाची वृद्धा आणि सांगलीतील 70 वर्षाची वृद्धा या सहाजणांचा मृत्यू झाला. 

आज उच्चांकी 339 नवे रूग्ण आढळले. त्यापैकी 254 रूग्ण महापालिका क्षेत्रातील आहेत. सांगलीत 173 आणि मिरजेत 81 रूग्ण निष्पन्न झाले. त्यामध्ये आरटीपीसीआर चाचणीत 204, ऍन्टीजेन चाचणीत 43 आणि मेट्रोपोलिस लॅबमधील 7 रूग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात कडेगाव तालुक्‍यात आसद व कडेगाव येथे रूग्ण आढळला. पलूस तालुक्‍यात 18 रूग्ण आढळले. त्यामध्ये पलूस शहरात सात, भिलवडीत पाच, कुंडल व खटावमध्ये प्रत्येकी दोन तर ब्रह्मनाळ, खंडोबाचीवाडी येथे प्रत्येकी एक रूग्ण आढळला. मिरज तालुक्‍यात 23 रूग्ण आढळले. त्यामध्ये समडोळीत येथे आठ, अंकलीत सहा, आरगमध्ये दोन तर नरवाड, तुंग, कसबे डिग्रज, लिंगनूर, माधवनगर, बुधगाव व कवलापूर येथे प्रत्येकी एक रूग्ण आढळला.

जत तालुक्‍यात दहा रूग्ण आढळले. त्यामध्ये शहरात दोन, लोहगावमध्ये तीन, शेगावमध्ये दोन आणि सोन्याळ, उटगी, निगडी येथे एक रूग्ण आढळला. कवठेमहांकाळ शहरात सात आणि बोरगावमधील आठ रूग्णासह तालुक्‍यात 15 रूग्ण आढळले. शिराळा तालुक्‍यात कोकरूडमध्ये तीन आणि शिराळा, निगडी येथे एक रूग्ण आढळला. खानापूर तालुक्‍यात चिखलहोळ, मंगरूळ, विटा येथे प्रत्येकी एक रूग्ण आढळला. आटपाडी शहरात पाच व कामतमधील एका रूग्णासह तालुक्‍यात सहा रूग्ण आढळले. तासगावमध्ये एक तर वाळवा तालुक्‍यात आष्टा व मसुचीवाडी येथे एक रूग्ण आढळला. 

जिल्ह्यातील चित्र- 

  • आजअखेरचे एकुण रूग्ण- 2643 
  • उपचार घेत असलेले रूग्ण- 1437 
  • आजअखेर बरे झालेले रूग्ण- 1128 
  • आजअखेर मृत रूग्ण- 78 
  • बाधितपैकी चिंताजनक- 92 
  • ग्रामीण भागातील एकुण- 981 
  • शहरी भागातील एकुण- 196 
  • महापालिका क्षेत्र एकुण- 1466 
     

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona-infested 339 patients .Six dead: 254 patients in municipal area