सांगली महानगरपालिकेतही कोरोनाचा शिरकाव ; शहरात नवे 35 रुग्ण 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 27 July 2020

गेल्या चोवीस तासात शहरात नवे 35 रुग्ण आढळले आहे. 

सांगली : जिल्हा परिषद, पोलिस दल पाठोपाठ आता महानगरपालिकेतही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. आरोग्य विभागातील सफाई कर्मचाऱ्याचा काल रात्री मृत्यू झाला. स्वॅब तपासणी केली असता कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे महापालिकेत कोरोनाचा शिरकाव झाल्याने घबराहट पसरली आहे. दुसऱ्या बाजूला गेल्या चोवीस तासात शहरात नवे 35 रुग्ण आढळले आहे. 

गेल्या काही दिवसांपासून महापालिका क्षेत्रात रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होवू लागली. पन्नासच्या पटीत रुग्ण आढळून येत असल्याने रुग्णसंख्येने साडेसातशे पार केले आहे. रॅपिड अँटीजेन चाचण्यांचाही यात समावेश आहे. काल दिवभरात तब्बल 67 रुग्ण मिळून आले होते. त्यात सांगलीत 41, तर मिरज शहरात 26 रुग्ण आढळून आले. रात्री एका सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. त्यानंतर स्वॅबचे नमुने तपासले असता कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. जिल्हा परिषद, पोलिस दल पाठोपाठ आता महापालिकेतही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. 

दरम्यान, आज सकाळपासून इंदिरानगर झोपडपट्टी आणि गवळी गल्ली परिसरात रॅपिड अँटीजेन चाचणी घेण्यात येत आहे. तेथील नागरिकांच्या परवानगीने ही चाचणी केली जात आहे. 

संपादन ः शैलेश पेटकर 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona infiltration in Sangli Municipal Corporation; 35 new patients in the city