वाळवा तालुक्‍यात कोरोनाबाधित 8; मृत्यू 2

Corona obstructed in Valva taluka 8; Death 2
Corona obstructed in Valva taluka 8; Death 2

इस्लामपूर : वाळवा तालुक्‍यात कोरोना विषाणूच्या संसर्गाने आणखी दोघांचा मृत्यू झाला आहे. या दोन दिवसांत इस्लामपूर शहर आणि कामेरी अशा दोन ठिकाणच्या बळींची नोंद झाली आहे. तालुक्‍यातील कोरोनाबाधित रुग्णांची सध्याची संख्या 8 असून लोकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. 

सांगली जिल्ह्यात कोरोनाचा सर्वांत पहिला रुग्ण वाळवा तालुक्‍यातील इस्लामपूर शहरात सापडला होता. त्यानंतर एकाच वेळी ती संख्या 25 वर पोचली होती. नंतर जिल्ह्यात कोरोना पसरला. नंतरच्या काळात कोरोना आटोक्‍यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न झाले.

त्यात प्रशासनाला यशही आले; परंतु लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर आता पुन्हा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत असल्यामुळे काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे. काल शहरातील दत्त टेकडी परिसरातील 64 वर्षीय व्यक्तीचे निधन झाले. ते सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक होते.

मृत्यूनंतर त्यांचा आज कोरोना तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दोन दिवसांपूर्वी कामेरीतील 87 वर्षीय महिलेचे कोरोनाने निधन झाले आहे. त्यांच्या संपर्कातील लोकांची योग्य ती दक्षता घेतली जात असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी साकेत पाटील यांनी सांगितले..


संपादन : प्रफुल्ल सुतार 
सांगली 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com