कोरोनाबाधित सापडल्याने हरेगाव, उंदिरगाव धास्तावले, तीन दिवस लॉकडाऊन

Corona Patient Detected Haregaon, Uandirgaon Terrified, Lockdown For Three Days
Corona Patient Detected Haregaon, Uandirgaon Terrified, Lockdown For Three Days

श्रीरामपूर ः गोवर्धनपूर येथे कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने परिसरातील गावांमध्येही धास्ती वाढली आहे. ग्रामपंचायत व प्रशासनाने अधिक दक्षता घेत हरेगाव व उंदिरगाव येथे तीन दिवस पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, कालपासूनच (ता. सहा ते नऊ) अत्यावश्‍यक सेवाही बंद ठेवण्यात आल्या आहेत. गावातील गल्ली-बोळातील रस्ते बंद केले आहेत. बाहेरील कोणालाही गावात जाण्यास प्रतिबंध केला आहे, अशी माहिती सरपंच सुभाष बोधक, उपसरपंच रमेश गायके, दीपक नवगिरे यांनी दिली. 

गोवर्धनपूर येथील गतिमंद तरुणाला शनिवारी (ता.4) मिरगी (फीट) आल्याने त्याला सुरवातीला लोणीत, नंतर विळद घाटातील विखे फाउंडेशनच्या रुग्णालयात व नंतर पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल केले होते. तेथे तो कोरोनाग्रस्त असल्याचे निष्पन्न झाले. त्याचा अहवाल मिळताच प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील यांनी तातडीने पावले उचलली. नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांना तातडीने औषध फवारणीचे मशीन दिले. हरेगावच्या संपूर्ण बाजारपेठेत औषधफवारणी करण्यात आली. वैद्यकीय पथक गावात तळ ठोकून आहे. गावातील घरोघरी जावून तपासणी केली जात आहे. कोणीही घराबाहेर पडू नये, अशी सूचना ग्रामपंचायत प्रशासनाने केली आहे. 
दरम्यान, गोवर्धनपूर, सराला, माळेवाडी, हरेगाव, निमगाव खैरी, नाऊर, नायगाव, रामपूर, जाफ्राबाद या गोदावरी पट्ट्यातील गावांत कडेकोट "लॉक डाऊन' पाळण्याच्या सुचना प्रशासनाने केल्या आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com