शिराळा तालुक्‍यात मोरेवाडीत कोरोनाचा शिरकाव...बिळाशीत दुसरा रूग्ण सापडला...तालुक्‍यात आजअखेर 139 

शिवाजीराव चौगुले 
Thursday, 9 July 2020

शिराळा (सांगली)- शिराळा तालुक्‍यातील मोरेवाडी येथे मुंबईहुन आलेल्या 50 वर्षीय वृद्धास व बिळाशी येथील 23 वर्षीय युवकास कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या संपर्कातील 12 लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. मोरेवाडी येथे कोरोनाचा शिरकाव झाला असुन बिळाशी येथील हा दुसरा रुग्ण आहे. 

मोरेवाडी येथे 50 वर्षाचा रुग्ण 4 जुलैला मुंबईहून येऊन घरी क्वारंटाईन झाला होता. 50 वर्षावरील असल्याने स्वॅब घेतला असता अहवाल "पॉझिटिव्ह' आला आहे. बिळाशी येथे मुंबईहुन 4 जुलैला आलेल्या 23 वर्षीय युवकास कोरोनाची लागण झाली आहे. तो शाळेत क्वारंटाईन होता. मुंबईहून आल्याने त्यास 5 जुलैला त्रास जाणवू लागल्याने त्यांचा स्वॅब घेतला असता तो कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्या संपर्कातील 8 आणि मोरेवाडी येथील रुग्णाच्या संपर्कातील 4 जणांना शिराळा येथे क्वारंटाईन करण्यात आले आहे. 

आज अखेर तालुक्‍यातील 27 गावे कोरोना बाधित झाली आहे. तालुक्‍यात एकूण 139 रुग्ण झाले आहेत. मणदूर येथील 63, रिळे येथे 6, निगडी 8, किनरेवडी येथे 4, मांगले व रेड, शिराळा प्रत्येकी 3, मोहरे, खेड, खिरवडे, सोनवडे( काळोखेवाडी ), माळेवाडी, बिळाशी येथे प्रत्येकी 2, अंत्री खुर्द, करुंगली, चिंचोली, पणुंब्रे तर्फ शिराळा, लादेवाडी, पुनवत, कोकणेवाडी, ढाणकेवाडी, उपवळे, चरण, मोरेवाडीत प्रत्येकी एक, शिराळे खुर्द 20 , कोकरूड 4 असे 139 रुग्ण झाले आहेत. 

संपादन : घनशाम नवाथे 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona patient found in Morewadi in Shirala taluka . Another patient was found in Bilashi