सांगली : शिगावातील 'त्या' भाजी विक्रेत्या महिलेचा कोरोनाने मृत्यू  

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 July 2020

आरोग्य विभागाने तातडीने त्याच्या कुटुंबातील व शेजारी राहणाऱ्या एकूण सहा जणांना इस्लामपूर येथे इंन्स्टिट्युशनल क्वारंटाईन करण्यात आले आहे.

शिगाव (सांगली)- वाळवा तालुक्यातील शिगाव येथील ४८ वर्षीय कोरोना बाधित भाजी विक्रेत्या महिलेचा आज मिरज कोविड रूग्णालयात उपचार सुरू आसतानाच मृत्यू झाला. आरोग्य विभागाने तातडीने त्याच्या कुटुंबातील व शेजारी राहणाऱ्या एकूण सहा जणांना इस्लामपूर येथे इंन्स्टिट्युशनल क्वारंटाईन करण्यात आले आहे.

 संबधित महिलेला मंगळवारी (ता.१४ ) ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे दिसून येताच तिला मिरज येथील कोविड रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिचा सबंधित अहवाल आज पाॅझिटीव्ह आला होता. परंतु, उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने नागरिकांच्या मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याचीच खबरदारी म्हणून आरोग्य अधिकारी साकेत पाटील, प्रथम वैद्यकीय अधिकारी प्रियांका राजमाने, सरपंच उत्तम गावडे, ग्रामसेवक आर. डी. कमाने जितेंद्र पाटील यांनी यांनी तातडीने भागात भेट देऊन त्याच्या संपर्कात आलेल्या 'सहा' जणांना इन्स्टिट्युट क्वारंटाईन करून संबधित भागात जाणारे सर्व रस्ते सील केले आहेत.

हे पण वाचा - Video - बंबात जाळ अन्‌ कोल्हापूरचा विषयच हार्ड; या भावाच्या व्हिडिओने लावलंय सगळ्यांनाच याड

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona positive women dead in sangli