esakal | सावधान! नियमावली जाहीर: अपार्टमेंटस्‌ना होणार दहा हजार दंड
sakal

बोलून बातमी शोधा

covid 19

सावधान! नियमावली जाहीर: अपार्टमेंटस्‌ना होणार दहा हजार दंड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली : महापालिकेच्यावतीने काल येत्या एक मे पर्यंतची कोरोना नियमावली जाहीर करण्यात आली. त्यानुसार गृहनिर्माण सोसायट्या अपार्टमेंटसाठी कोरोना नियमावलीचे उल्लंघन झाल्यास दहा हजारांच्या दंड ठोठावण्यात येणार आहे. पुन्हा पुन्हा उल्लंघन केल्यास प्रत्येकवेळी दहा हजारांनी त्यात वाढ होईल.

एखाद्या अपार्टमेंटमध्ये पाचपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळल्यास संबंधित सोसायटीला सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात येणार आहे. मुख्य प्रवेशद्वारावर तसा फलक लावणे बंधनकारक असेल. बाहेरच्या लोकांना तिथे प्रवेश नसेल. या सोसायटीतील प्रत्येक ४५ वर्षांवरील व्यक्तीचे लसीकरण बंधणकारक असेल. नियमानुसार लसीकरण होत नाही तोपर्यंत तेथे राहणाऱ्या व नियमित प्रवेश करणाऱ्या सर्वांना अन्य सर्वांना कोरोना चाचणी करणे बंधनकारक असेल.

लग्नसमारंभासाठी आता २५ नातेवाईकांनाच परवानगी असेल. उपस्थित सर्वांना कोरोना चाचणी करूनच घ्यावी लागेल. नियमाप्रमाणे लसीकरणही बंधनकारक असेल. तेथे नियमभंग करणारी व्यक्ती आढळल्यास प्रत्येकी हजार रुपये दंड असेल. मंगलकार्यालयावर दहा हजार रुपये दंड असेल. सतत नियमभंग झाला असेल तर त्यापेक्षत्रा अधिक दंड लावला जाईल.अंत्यसंस्कारासाठी २० जणांना उपस्थित राहण्यास मुभा असेल.

Edited By- Archana Banage