कोरोना उपचारांची यंत्रणा कोलमडली... अपुरे मनुष्यबळ,तोकडी यंत्रणा आणि रुग्णांची वाढती संख्या 

प्रमोद जेरे 
Sunday, 19 July 2020

मिरज(सांगली) - जिल्ह्याचे कोरोना रुग्णालय असलेल्या मिरज शासकीय रुग्णालयातील यंत्रणा कोलमडु लागली आहे. साहजिकच कोरोनाग्रस्त रुग्णांचे उपचार आणि सकस आहाराअभावी हेळसांड होते आहे. अपुरे मनुष्यबळ,तोकडी यंत्रणा आणि रुग्णांची वाढती संख्या यामध्ये मिरज शासकीय रुग्णालय प्रशासनाची प्रचंड ताराबंळ होते आहे. यावर उपाय म्हणुन शहरातील खासगी रुग्णालये आणि महाविद्यालयांच्या इमारती ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण तोपर्यंत मात्र रुग्णांवरील उपचारांची सोय करण्यासाठी शासकीय रुग्णालय प्रशासनास तारेवरची कसरत करावी लागते आहे.

शहरातील शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाशी सलंग्न असलेल्या रुग्णालयाचे कोरोना रुग्णालयाचे रुपांतर कोव्हीड रुग्णालयात करण्यात आले आहे. त्यामुळे येथील अन्य सर्व विभाग बंद करण्यात आले आणि सांगलीच्या शासकीय रुग्णालयात यावरील उपचारांची सोय करण्यात आली आहे.या ठिकाणी सांगली जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचारांची सोय करण्यात आली. त्यामुळे येथील सर्व यंत्रणा सध्या कोरोना रुग्णांसाठी राबते आहे. सध्या या रुग्णालयात अतिदक्षता विभागात 58 रुग्णांवरील उपचारांची सोय करण्यात आली आहे.

या सर्व खाटांवर सध्या रुग्ण उपचार घेत आहेत. याच अतिदक्षता विभागात रुग्णांना दाखल करण्यासाठी रुग्णांना आणि डॉक्‍टरांनाही अतिक्षता विभागातील रुग्णांच्या सुटकेची प्रतिक्षा करावी लागते आहे. त्यामुळे या अतिदक्षता विभागाची क्षमता 58 वरुन 82 पर्यंत नेण्याच्या हालचाली सुरू आहेत.याशिवाय रुग्णालयात कोरोनासाठी उपचार घेणा-या रुग्णांची संख्या दर तासागणीक वाढते आहे. या रुग्णालयातील सर्व खाटांवर सध्या कोरोनाचे रुग्ण दाखल झाल्याने रुग्णालय प्रशासनाने सध्या शासकीय तंत्रनिकेतन आणि जिल्हा क्रिडा संकुलातही कोरोनावरील उपचारांची तात्पुरती सोय केली आहे. याशिवाय शहरातील मोठ्या क्षमतेची खासगी रुग्णालये आणि शाळा महाविद्यालयातही संस्था विलगीकरण कक्ष आणि शक्‍य झाल्यास कोरोना उपचारांचे केंद्रही सुरू करण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. 
मनुष्यबळाचे काय ? 

वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णालयातील सर्व यंत्रणांवर सध्या कमालीचा ताण येतो आहे. यामध्ये प्रामुख्याने सर्वाधिक ताण हा रुग्णालयातील डॉक्‍टर, परिचारक, आणि स्वच्छता कर्मचा-यांवर येत आहे. निकृष्ट अन्नपदार्थ,अस्वच्छता, उपचार याबाबत थेट रुग्णांकडुन सातत्याने सोशल मिडीयावर तक्रारींचे सुर आळविले जात आहेत. त्यामुळे येथील मनुष्यबळ वाढविणे नितांत गरजेचे असल्याचे रुग्णालय प्रशासनाचे मत आहे. 

संपादन : घनशाम नवाथे 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona treatment system collapses . Insufficient manpower, cell system and growing number of patients