कोरोनाला हरवण्यासाठी नगरकरांनी काय केलं हे, बघा.. तुम्हालाही जमेल... 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 मार्च 2020

कोरोनासंदर्भात काहीजण सोशल मीडियावर हास्यविनोद करण्यावर गुंतले आहेत. तर काहीजण पोलिस यंत्रणा, सरकारच्या धोरणावर टीका करण्यात धन्यता मानत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असे म्हणाले, ते कसे चुकीचे आहेत. मोदी किती ग्रेट आहेत. किंवा मोदीभक्त कसे ढोंगी आहेत, अशा उलटसुलट विधानाद्वारे एकमेकांना ट्रोल करण्यात मग्न आहेत. परंतु तुम्हाला नगकरकरांसारखं काही करता येईल...

नगर ः कोरोना व्हायरसविरूद्ध युद्ध सुरू झालं आहे. पोलिस, डॉक्‍टर, नर्स हे चोवीस तास सेवा देऊन मोलाचे योगदान देत आहेत. काही स्वयंसेवी संस्थाही पुढे सरसावल्या आहेत. त्याही आपापल्या परीने विषाणूविरूद्ध लढा देत आहेत. 

जगभरात वेगाने फोफावणाऱ्या या विषाणूने नगर शहरातही पाऊल ठेवलं आहे. आतापर्यंत तब्बल 256 जणांना क्वॉरंटाईन केलं आहे. 196जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले असले असली धाकधुक काही कमी झालेली नाही. दोनजणांचे रिपोर्ट येणं बाकी आहे. केवळ दोघांनाच आतापर्यंत बाधा झालेली असली प्रशासनाने सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केलं आहे. 

corona help line 1

राज्यात कलम 144 लागू झालं आहे. त्यामुळे जमावबंदी करता येणार नाही. नगर महापालिकेने आणखी काळजी घेत नागरिकांना काही निर्बंध लादले आहेत. खासगी वाहनांना प्रवेश बंदी केली आहे. गर्दी कमी करण्यासाठी ही उपाययोजना आणली आहे. काल देशात जनता कर्फ्यू होता. नगर लॉक डाऊन झाल्याने विद्यार्थी, परगावचे प्रवासी, पेशंट यांचे जेवणावाचून हाल होत आहेत. खानावळ, हॉटेल्स बंद झाल्याने ते त्राही माम झालेत. 

शिख, पंजाबी सेवा समिती ग्रेट वर्क 
जे लोख भुकेले आहेत त्यांच्यासाठी शिख, पंजाबी सेवा समिती पुढे सरसावली आहे. नगरकरांच्या मदतीसाठी ही समिती नेहमीच कार्यरत असते. कर्फ्युच्या काळात या समितीच्या स्वयंसेवकांनी तब्बल साडेतीनशे डबे घरपोहोच केले. आज सकाळपासूनच त्यांचे स्वयंसेवक डबे पोहोच करीत आहेत. संजयनगर झोपडपट्टीत त्यांनी 150 डबे दिले. काही रूग्णालयातही त्यांनी ही सेवा दिली. सुरूवातीला शिख, पंजाबी व लायन्स क्लबने या कार्याला प्रारंभ केला. आता शहरातील स्वयंसेवी संस्था, कॉमन नगरकरही आपलं योगदान देत आहे.

कसे चालते काम 
लोकांच्या मदतीसाठी त्यांनी कोरोना हेल्प ग्रुप हाव्हॉटस ऍप ग्रुप सुरू केला आहे. त्या ग्रुपवर किती डबे हवे आहेत फक्त याची मागणी नोंदवायची. सोबत पत्ताही द्यायचा. समितीचे त्या त्या भागातील स्वयंसेवक स्वतःच्या घरी जेवण तयार करतात. ज्यांनी मागणी केली आहे. त्यांच्या घराच्या दारात ते ठेवतात. कारण त्यामुळे आपण आणि तेही आपल्या संपर्कात येणार नाही, याची काळजी घेतात. किंवा जास्तीची मागणी असेल तर दारात मोठं भांडं ठेवायचं. या जेवणासाठी कोणताही चार्ज आकारला जात नाही.

corona help line 2

आपण कशात गुंतलोय पहा... 

कोरोनासंदर्भात काहीजण सोशल मीडियावर हास्यविनोद करण्यावर गुंतले आहेत. तर काहीजण पोलिस यंत्रणा, सरकारच्या धोरणावर टीका करण्यात धन्यता मानत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असे म्हणाले, ते कसे चुकीचे आहेत. मोदी किती ग्रेट आहेत. किंवा मोदीभक्त कसे ढोंगी आहेत, अशा उलटसुलट विधानाद्वारे एकमेकांना ट्रोल करण्यात मग्न आहेत. परंतु आपणही गर्दी कशी टाळता येईल, यासाठी योगदान देऊ शकतो. किंवा अडकून पडलेल्यांसाठी आपण दिलासा देऊ शकतो. नगरच्या शिख पंजाबी समितीने जे केलं ते तुम्हाला जमू शकते, बघा जमतंय का? 

असा मिळवता येईल डबा 
नगरमध्ये सध्या खासगी वाहनांना बंदी आहे. जे खासगी वाहने घेऊन फिरतात, त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. काहींकडून दंड वसूल केला जात आहे. तर काही जणांना फटके दिले जात आहेत. त्यामुळे या समितीच्या स्वयंसेवकांना वाहने चालविण्यास अडचण येत आहे. त्यामुळे त्यांनी मोजक्‍या जागेवर स्टॉल लावले आहेत. तेथे येऊन जेवण घेऊन जाता येईल. ज्यांना नगरमध्ये जेवण हवे असेल तर 9423162727 या मोबाईल नंबरवर एसएमएस किंवा व्हॉटस ऍप करावा. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Virus Ahmadnagar did, you can too