esakal | अभियंत्याने बनवली दिव्यांगासाठी कोरोना व्हिल चेअर...लॉकडाऊनमधील वेळेचा सदुपयोग
sakal

बोलून बातमी शोधा

wheelchair.jpg

मिरज (सांगली)-  कोरोना संसर्गामुळे लागू केलेल्या लॉकडाऊन काळात रिकाम्या वेळेत नामी शक्कल लाढवत सुभाषनगर (ता. मिरज) येथील आमिर खान तरूणाने दिव्यांगासाठी बॅटरीवरील इलेक्‍ट्रिक व्हील चेअर तयार करून दिव्यांगांना परिश्रम विरहित प्रवास करण्याचा आनंद देण्याचा प्रयत्न आहे. याचे नामकरण देखिल कोरोना व्हिल चेअर असेच ठेवले आहे. हा तरूण सध्या पुणे येथील टाटा मोटर्स कंपनीमध्ये अभियंत्ता म्हणून कार्यरत आहे. पहिल्यापासून दिव्यांगासाठी काहीतरी नवीन कार्य करण्याच्या इच्छेतून त्याने लॉकडाऊनच्या काळात या संकल्पनेवर काम केले. 

अभियंत्याने बनवली दिव्यांगासाठी कोरोना व्हिल चेअर...लॉकडाऊनमधील वेळेचा सदुपयोग

sakal_logo
By
शंकर भोसले

मिरज (सांगली)-  कोरोना संसर्गामुळे लागू केलेल्या लॉकडाऊन काळात रिकाम्या वेळेत नामी शक्कल लाढवत सुभाषनगर (ता. मिरज) येथील आमिर खान तरूणाने दिव्यांगासाठी बॅटरीवरील इलेक्‍ट्रिक व्हील चेअर तयार करून दिव्यांगांना परिश्रम विरहित प्रवास करण्याचा आनंद देण्याचा प्रयत्न आहे. याचे नामकरण देखिल कोरोना व्हिल चेअर असेच ठेवले आहे. हा तरूण सध्या पुणे येथील टाटा मोटर्स कंपनीमध्ये अभियंत्ता म्हणून कार्यरत आहे. पहिल्यापासून दिव्यांगासाठी काहीतरी नवीन कार्य करण्याच्या इच्छेतून त्याने लॉकडाऊनच्या काळात या संकल्पनेवर काम केले. 

शिक्षण घेत असताना पेट्रोल/बॅटरी व सौर ऊर्जेवर चालणारी हायब्रिड इलेक्‍ट्रिक कार त्याने तयार केली होती. या कारला केपीआयटी पुणे या कंपनीची मान्यता प्राप्त झाली. याच अनुभवाच्या जोरावर आमिरने इलेक्‍ट्रिक व्हील चेअरचे मॉडेल तयार केले. एप्रिल ते जून लॉकडाऊन काळात अथक प्रयत्नाने त्याने या संकल्पनेला मूर्त स्वरूप दिले. यासाठी त्याने उपयुक्‍त टाकावू वस्तूंचा वापर केला. ही व्हील चेअर तीन चाकी असून बॅटरीवर चालते. बॅटऱ्या एकदा चार्ज केल्यावर पन्नास किलोमीटर फिरते. चालवताना कोणताही आवाजाचा त्रास होत नसून, दिव्यांगाना उपयुक्त ठरणार आहे. 

दिव्यांगांना अपंगत्वामुळे नैसर्गिक विधी करता येत नाही की उठून बसता, फिरता येत नाही. अशा परिस्थितीत आई-वडिलांनाच व्हिल चेअर वरून ढकलत फिरवावे लागते. त्यांच्यासाठी सदर तयार केलेली इलेक्‍ट्रिक व्हील चेअर उपयुक्त ठऱणार आहे. ही व्हिल चेअर त्याने सुभाषनगर येथील आपला मित्र जुबेर कमालपाशा शेख याला सुपूर्द करण्यात आली. 

मित्राला होणाऱ्या त्रासातून केला संकल्प 
आमीर सध्या पुणे येथील टाटा मोटर्स कंपनीमध्ये इलेक्‍ट्रिकल अभियंत्ता म्हणून कार्यरत आहे. "माझे सुभाषनगर येथील दिव्यांग मित्र जुबेर कमालपाशा मी गावी आल्यास कोणास तरी सोबत घेऊन व्हिल चेअर ढकलत माझ्याकडे यायचा. यावेळी त्यांना झालेला त्रास असाह्य होत असते. तेव्हापासून दिव्यांगांसाठी हायटेक व्हिल चेअर बनवण्याचा संकल्प केला. लॉकडाऊनच्या काळात मिळालेल्या मोकळ्या वेळात टाकावू वस्तूंमधून या व्हिलचेअरचा संकल्प पूर्ण झाला', असे आमीरने सांगितले. 

loading image
go to top