ग्रामीणमध्ये कोरोनाचा विळखा घट्ट ! रुग्णसंख्या दोन हजाराच्या उंबरठ्यावर; आज 'या' गावात सापडले 171 रुग्ण 

तात्या लांडगे
Monday, 20 July 2020

तालुकानिहाय रुग्णसंख्या 

 • अक्‍कलकोट : 359 
 • बार्शी : 489 
 • करमाळा : 25 
 • माढा : 75 
 • माळशिरस : 89 
 • मंगळवेढा : 52 
 • मोहोळ : 149 
 • उत्तर सोलापूर : 171 
 • पंढरपूर : 149 
 • सांगोला : 13 
 • दक्षिण सोलापूर : 423 
 • एकूण : 1,994

सोलापूर : ग्रामीण भागात आज नव्या 171 रुग्णांची भर पडली. आज एकूण एक हजार 495 व्यक्‍तीची कोरोना टेस्ट करण्यात आली असून त्यापैकी एक हजार 324 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मार्डी (ता. उत्तर सोलापूर) येथील 56 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आता ग्रामीण भागातील रुग्णसंख्या एक हजार 994 झाली असून मृत्यूची संख्या 45 झाली आहे. आतापर्यंत 604 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून सध्या एक हजार 345 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

अक्‍कलकोट तालुक्‍यातील ए-वन चौक, भारत गल्ली, भारत गॅस गोडाऊनजवळ, देशमुख गल्ली, माणिक पेठ, अंकलगी, बोरगाव, चुंगी, जेऊर, किणी याठिकाणी एकूण 23 रुग्ण सापडले आहेत. तर माळशिरस तालुक्‍यातील अकलूज, एकशिव, नातेपुते, वेळापूर याठिकाणी 13 रुग्ण सापडले आहेत. माढ्यातील चौधरी वस्ती, सन्मती नगर येथे प्रत्येकी एक रुग्ण तर मोहोळमधील अण्णाभाऊ साठे नगर, मार्केट यार्ड, पंढरपूर रोड, कामती बु. व कामती खूर्द, कोळेगाव या गावांमध्ये एकूण आठ रुग्ण सापडले आहेत. दक्षिण सोलापुरातील बक्षिहिप्परगा, भंडारकवठे, हत्तूर, होनमुर्गी, कासेगाव, मंद्रूप या गावांमध्ये 16 रुग्णांची भर पडली आहे. पंढरपुरातील भुयाचा मारुती गल्ली, इसबावी, रोहिदास चौक, उमदे गल्ली, कान्हापुरी येथे 13 रुग्ण सापडले आहेत. सांगोल्यातील कोळा येथे एक रुग्ण सापडला आहे. तर बार्शीतील घोडगे प्लॉट, हिरेमठ हॉस्पिटल कपांउंड, सुभाष नगर, वाणी प्लॉट, झाडबुके मैदान, नळे प्लॉट, नवीन पोलिस लाईन, स्वराज कॉलनी, भवानी पेठ, राऊत चाळ, खुर्पे गल्ली, तुळजापूर रोड, चोरमले प्लॉट, शेळके प्लॉट, देसाई प्लॉट, दत्त नगर, मुळे प्लॉट, दडशिंगे, गुळपोळी, कुसळंब, वैराग, मुंगशी, तडवळे, जामगाव, शेळगाव, चिंचोली या गावांमध्ये 56 रुग्ण सापडले आहेत. तर उत्तर सोलापुरातील बीबी दारफळमध्ये दोन, हिरजमध्ये एक तर नान्नजमध्ये तब्बल 16 रुग्णांची भर पडली आहे. 

तालुकानिहाय रुग्णसंख्या 

 • अक्‍कलकोट : 359 
 • बार्शी : 489 
 • करमाळा : 25 
 • माढा : 75 
 • माळशिरस : 89 
 • मंगळवेढा : 52 
 • मोहोळ : 149 
 • उत्तर सोलापूर : 171 
 • पंढरपूर : 149 
 • सांगोला : 13 
 • दक्षिण सोलापूर : 423 
 • एकूण : 1,994  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronas grip tight in solapur rural areas Today found 171 patients