कडेगाव तालुक्‍यात कोरोनाचा तिसरा बळी; 52 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

संतोष कणसे
Sunday, 12 July 2020

विशाखापट्टणम येथून तालुक्‍यातील भिकवडी खुर्द येथे आलेल्या 52 वर्षीय कोरोना बाधीत व्यक्तीचा आज उपचार सुरु असताना मृत्यू झाला.

कडेगाव (जि. सांगली) : विशाखापट्टणम येथून तालुक्‍यातील भिकवडी खुर्द येथे आलेल्या 52 वर्षीय कोरोना बाधीत व्यक्तीचा आज उपचार सुरु असताना मृत्यू झाला.तालुक्‍यातील कोरोनाचा तिसरा बळी गेला आहे. तर ठाणे येथून कडेगाव येथे आलेल्या 73 वर्षीय व्यक्तीचा आज कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आला आहे.तालुक्‍यात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून तालुक्‍यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या आज 31 वर पोहोचली आहे.तालुक्‍यातील नागरिकांत प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

विशाखापट्टणम येथून 52 वर्षीय व्यक्ती 5 जून रोजी तालुक्‍यातील भिकवडी खुर्द येथे आली होती. आरोग्य विभागाने त्यांना होम क्वारंनटाईन केले होते.त्यांचा क्वारंनटाईन कालावधी संपून गेला होता.त्यानंतर त्यांच्या घशातील स्वाईबचे नमुने घेतले होते.त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला तर आज उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. 
तर ठाणे येथून गुरुवारी (ता.2) कडेगाव येथे आलेल्या 73 वर्षीय व्यक्तीचा कोरोनाचा रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आला आला आहे.त्यामुळे शहरातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने कडेगाव व भिकवडी खुर्द येथील संपूर्ण संबंधित परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला असून चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

भिकवडी खुर्द येथे कोरोनाबाधीत व्यक्तीचा मृत्यू झाल्याने व कडेगाव शहरात कोरोनाचा आज नवीन रुग्ण आढळल्याने प्रांताधिकारी गणेश मरकड,तहसीलदार डॉ.शैलजा पाटील,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.माधव ठाकूर,पोलीस निरीक्षक विपीन हसबनिस यांनी भिकवडी खुर्द व कडेगाव येथे भेट देऊन उपाययोजना केल्या.तसेच येथील संबंधीत परिसर संपूर्ण कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केले असून येथील सर्व रस्ते सील केले आहेत.तसेच येथे चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे  तर आरोग्य विभागाने संबंधित कोरोनाबाधीत व्यक्तीच्या संपर्कातील लोकांचा शोध सुरु केला आहे. 

तसेच आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी येथे घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी सुरु केली असून कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंगही सुरु केले आहे.तर कडेगाव व भिकवडी खुर्द येथे संबंधित परिसरात रोगप्रतिबंधक औषध फवारणी करुन निर्जंतुकीकरण केले जात आहे.तर तालुक्‍यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत चालल्याने संपूर्ण तालुक्‍यातील नागरिकांनी कोरोनाची चांगलीच धास्ती घेतली आहे. 

संपादन - युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona's third victim in Kadegaon taluka; Death of a 52-year-old man