सांगलीत कोरोनामुक्तीसाठी ‘त्रिसूत्री’ची मात्रा : जयंत पाटील 

Coronation free ways in islampur kokan marathi news
Coronation free ways in islampur kokan marathi news

सांगली : ‘‘जिल्ह्यातील इस्लामपुरातील २६ रुग्णांपैकी २२ रुग्णांना कोरोना व्हायरसची लागण झाली नसल्याचा अहवाल आल्याने सांगली जिल्हा आता जवळपास कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहे. लॉकडाउन, विलगीकरण तसेच इतर गोष्टींच्या अचूक नियोजनामुळे या साथीवर नियंत्रण मिळवणे शक्‍य झाले,’’ अशा भावना सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केल्या.

२६ पैकी २२ रुग्ण कोरोनामुक्त

पाटील म्हणाले की, सर्वांना सांगण्यास अत्यंत आनंद होतोय की इस्लामपुरातील २६ पैकी रुग्ण २२ आता कोरोनामुक्त झाले आहेत. हळूहळू आम्ही कोरोनावर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी होत आहोत. जिल्ह्यात २५ रुग्ण आढळल्याने पालकमंत्री व इस्लामपूर मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी दुहेरी दडपणात होतो; मात्र रुग्णांचा चाचणी अहवाल ‘निगेटिव्ह’ येत असल्याने आता दिलासा मिळत आहे. 

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आम्ही विलगीकरण, समूह संसर्गाच्या ठिकाणाची ओळख व तत्काळ कार्यवाही हे त्रिसूत्री धोरण जिल्ह्यात अमलात आणले. प्रशासन व नागरिकांच्या सहकार्याने आम्ही कोरोनाच्या प्रादुर्भावाला आटोक्‍यात आणले आहे, असे सांगत पाटील यांनी प्रशासनाचे आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com