Coronavirus : सहांचे रिपाेर्ट निगेटिव्ह; 19 दाखल, खावलीत 100 क्वारनंटाईनची सुविधा

Coronavirus : सहांचे रिपाेर्ट निगेटिव्ह; 19 दाखल, खावलीत 100 क्वारनंटाईनची सुविधा

सातारा :  सातारा येथील शासकीय रुग्णालयात विलगीकरण कक्षात सहा पुरुषांना अनुमानित म्हणून दाखल करण्यात आले होते. या सर्व रुग्णांच्या घशातील स्त्रावाचे नमुने एन.आय.व्ही. पुणे येथे तपासणी करीता पाठविण्यात आले होते. त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. 


सातारा जिल्ह्यातील परदेश प्रवास करुन आलेले 16 नागरिक व बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेले 3 नागरिक असे एकूण 19 नागरिकांना अनुमानित म्हणून जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.
 
हे 16 नागरिक हे परदेश प्रवास करुन आलेले असून त्यामध्ये अंदाजे 20 ते 60 वर्ष वयोगटातील 14 पुरुष व दाेन महिला आहेत. तसेच बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेले तीन नागरिक अंदाजे 20 ते 60 वर्ष वयोगटातील महिला आहेत. त्यातील एका 40 वर्षीय महिलेस ताप, सर्दी व खोकल्याचा त्रास होत असल्याने या 19 जणांच्या घशातील स्त्रावाचे नमुने एन.आय.व्ही. पुणे येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

खावली येथे 100 रुग्णांसाठी क्वारनंटाईन सुविधा

सातारा  : जगभरात व भारतात मोठया प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण आढळून येत असून त्याच प्रमाणे महाराष्ट्रामध्येही मोठया प्रमाणावर रुग्ण आढळून येत आहेत. सातारा जिल्हयातही काही दिवसां पासून संशयीत रुग्ण आढळून येण्यास सुरुवात झाली असून त्या वरील उपाय योजना जिल्हाधिकारी शेखर सिंह सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात सुरुवात झालेली आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांनी दिली आहे. 

JantaCerfew : आता सातारा जिल्ह्यातील या शहरात पुन्हा दाेन दिवस जनता कर्फ्यू

या उपययोजनेचा भाग म्हणून सातारा तालुक्यातील खावली येथील नवोदय विद्यालय येथे 100 संशयीत रुग्णांकरीता  क्वारंटाईन सुविधा तयार करण्यात  आलेली आहे. या ठिकाणी जे रुग्ण अॅडमीट करण्यात येतात त्यांना शासना मार्फत सर्व प्रकारच्या सुविधा पुरविण्यात येत आहेत. यामध्ये रुग्णास राहण्याची, तसेच त्यांना दोन वेळचे जेवण, दोन वेळा चहा व नाष्टा यांची सोय उपब्लध करुन देण्यात आली आहे. या ठिकाणी रुग्ण आल्यानंतर त्यांची काळजी घेण्याकरीता त्यांना मास्क व सॅनिटाईझर उपलब्ध करुन देणेत येतात. आज अखरे या ठिकाणी एकूण 41 रुग्ण यांना क्वारंटाईन करणेत आले होते, या पैकी 11 रुग्णांना क्वारंटाईन कालावधी संपल्याने सोडण्यात आले असून आजमितीस त्या ठिकाणी 30 रुग्ण क्वारंटाईनमध्ये आहेत.

    जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकिय पथकाची स्थापना करण्यात आली असून, कायमस्वरुपी दोन कर्मचारी सतत कार्यरत असतात व दिवसातून दोन वेळा वैद्यकिय अधिकारी हे संबंधीत रुग्णांना भेट देवून त्यांच्यावर योग्य ते उपचार करत आहेत. आजमितीस  क्वारंटाईनच्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात मास्क, सॅनिटाईझर व औषधासाठा उपलब्ध आहे. कोणत्याही संशयीत रुग्णास मास्क, सॅनिटाईझर व औषधे कमतरता होणार नाही याची दक्षताही घेण्यात येत आहे.

एक एप्रिल 2020 रोजीची सायंकाळी पाच वाजताची सातारा जिल्हा एन करोना 19 (कोव्हिड 19) आकडेवारी पूढील प्रमाणे 
 

  • एकूण दाखल - 82
  • जिल्हा शासकीय रुग्णालय- 67
  • कृष्णा हॉस्पीटल, कराड- 15
  • कोरोना नमुने घेतलेले-82
  • कोरोना बाधित अहवाल -2
  • कोरोना अबाधित अहवाल -50
  • अहवाल प्रलंबित -30
  • डिस्चार्ज दिलेले- 50
  • सद्यस्थितीत दाखल- 32
  • आलेली प्रवाशी संख्या (दिनांक 31.3.2020)  - 543
  • होम क्वारान्टीनमध्ये असलेल्या व्यक्ती - 543
  • होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण झालेल्या व्यक्ती - 357
  • होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पर्ण न झालेल्या व्यक्ती – 186
  • संस्थेमध्ये अलगीकरण केलेले- 46
  • यापैकी डिस्जार्ज केलेले- 15
  • यापैकी शासकीय रुग्णालय जनरल वार्डात-1
  • अद्याप दाखल -30
     

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com